‘दगडूशेठ गणपती’ बाप्पांना ५०० मिष्टान्नाचा महाभोग

तब्बल २५ हजार पणत्यांनी सजले दगडूशेठ गणपती मंदिर
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट ; त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त मंदिरासह कळसावरही दिव्यांची आकर्षक आरास

पुणे : गोड, आंबट, खारट, तिखट, तुरट अशा सर्व चवींनी युक्त नानाविध प्रकारची फळे, नमकीन पदार्थ, खाद्यपदार्थ आणि मिठाई अशा ५०० हून अधिक मिष्टान्नांचा महाभोग अन्नकोटाच्या माध्यमातून दगडूशेठ गणपतीसमोर मांडण्यात आला. मंदिराच्या कळसापासून ते गाभा-यापर्यंत तब्बल २५ हजार पणत्यांनी सजलेल्या मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्यावतीने त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दगडूशेठ गणपती मंदिरामध्ये दीपोत्सव आणि अन्नकोट आयोजित करण्यात आला होता. यावेळी ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.विनायक काळे, डॉ.मुरलीधर तांबे,  डॉ.अजय तावरे, डॉ.हरीश ताटिया, डॉ. सोनाली साळवी, ट्रस्टचे महेश सूर्यवंशी, सुनील रासने आदी उपस्थित होते.
मंदिराच्या कळसासह संपूर्ण गाभा-यात लावलेल्या पणत्यांनी मंदिराचा परिसर उजळून निघाला होता. याशिवाय तोरण आणि रांगोळ्यांनी मंदिराचा परिसर सजविण्यात आला.त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त आयोजित अन्नकोटाकरीता पदार्थ देण्याचे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले होते. त्यानुसार तब्बल ५०० हून अधिक भाविकांकडून विविध प्रकारचे पदार्थ मंदिरात गोळा झाले. ते सर्व पदार्थअन्नकोटामध्ये मांडण्यात आले. या सर्व पदार्थांचा प्रसाद ससून रुग्णालयात, वृद्धाश्रम, अंधशाळा आणि मंदिरातील भक्त यांना देण्यात येणार असल्याचे ट्रस्टतर्फे सांगण्यात आले.

Leave a Reply

%d bloggers like this: