fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsSports

ब्रिजस्टोन गोल्फ स्पर्धेत दुसऱ्या आठवड्यात जगदीश बेलवल, आदित्य मालपाणी, आदित्य पांडे यांची उत्कृष्ट खेळी; 

युवा खेळाडू नीती अगरवलची चमकदार कामगिरी 
 
पुणे : ऑगस्टीन आणि जगदीश बेलवल यांनी साध्य केलेल्या 2 दूर अंतरावरील ‘बर्डी’ मुळे ईगल स्ट्रायकर्स आणि बिंदास बॉईज यांच्यातील लढत अखेर बरोबरीत सुटली. ब्लुरीच गोल्फ कोर्स येथे सुरू असलेल्या ब्रिजस्टोन गोल्फ स्पर्धेतील दुसऱ्या आठवड्याची रोमांचकारी सांगता झाली. सहा संघांचा समावेश असलेल्या या स्पर्धेची ही दुसरी फेरी होती. मुंबई पुणे एक्सप्रेसवे नजीकच्या लोढा बेलमोडो कोर्ससह, हिंजवडी येथील ब्लुरीच कोर्स आणि कर्जत येथील नाईन एसएस कोर्स येथे एकाचवेळी ही स्पर्धा खेळली जात आहे. 
या स्पर्धेची संकल्पना आकाराला आणणारे एस गोलफिंगचे आदित्य मालपाणी यांनी सांगितले की, खेळाडूंना वैविध्य मिळावे आणि स्पर्धेची कठीण पातळी आणि दर्जा उंचावता यावा यासाठी आम्ही तीन वेगवेगळ्या गोल्फकोर्स वर ही स्पर्धा घेतली आहे. या स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीतील सर्वच लढती अत्यंत चुरशीच्या व अतितटीच्या झाल्या. यातील सर्वोत्तम सामना ईगल स्ट्रायकर्स व बिंदास बॉईज यांच्यात खेळला गेला व बिंदास बॉईज संघाच्या ऑगस्टीन व जगदीश बेलवल यांनी 18व्या होलवर फटकावलेल्या दोन अचूक बर्डीमुळे ही लढत अखेर बरोबरीत सुटली. या प्रकारच्या फॉरमॅट मध्ये सामना बरोबरीत सुटण्याची घटना खूपच दुर्मिळ असते असे मालपाणी यांनी सांगितले. दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण देण्यात आला.
आणखी एका लढतीत नाऊ मार्व्हेल संघाने रिगल वारीयर्स संघाचा 7 स्ट्रोक्सनी दणदणीत पराभव केला. तर, एअर स्ट्रायकर्स  संघाने बलाढ्य ऍमिगोज  संघावर 7 स्ट्रोक्सनी विजय मिळवून सनसनाटी निकालाची नोंद केली. पहिल्या दोन फेरीनंतर स्पर्धेची क्रमवारी अत्यंत चुरशीच्या अवस्थेत असून सर्वच संघांना चांगली कामगिरी करून गुण पालिकेत झेप घेण्याची संधी आहे.
नाऊ मार्व्हेल संघाची युवा खेळाडू नीती अगरवाल हिने दुसऱ्या फेरीत 69 गुणांची नोंद करताना अप्रतिम कामगिरी नोंदवली. ब्लुरीच कोर्सवर झालेल्या लढतीत तिने पहिल्या 9 होल्समध्ये 35 गुणांची तर, उरलेल्या होल्समध्ये 34 गुणांची नोंद केली. 
दुसऱ्या फेरीतील कामगिरी करणारे खेळाडू
1. आदित्य पांडे: 53 स्ट्रोक्स(1 अंडर पार)

2. सुरज बाहरी: 58 स्ट्रोक्स

2. संजीव ठाकूर: 58स्ट्रोक्स

3. आदित्य मालपाणी: 59 स्ट्रोक्स

3. राहुल वाचो: 59 स्ट्रोक्स

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading