Thursday, May 14, 2026
Latest NewsSports

पीवायसी  फिल्ट्रम चॅलेंजर करंडक निमंत्रित 25 वर्षाखालील गटाच्या तीन दिवसीय क्रिकेट स्पर्धेत 18 संघांचा समावेश

पुणे:  पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित पीवायसी  फिल्ट्रम चॅलेंजर करंडक (PYC Filtrum Challenger Trophy)  निमंत्रित 25 वर्षाखालील गटाच्या तीन दिवसीय क्रिकेट स्पर्धेत 18 संघांना आमंत्रित करण्यात आले असून स्पर्धेला 22  नोव्हेंबरपासून प्रारंभ होत आहे.  या स्पर्धेतील सामने  पीवायसी हिंदू जिमखाना, डेक्कन जिमखाना, पुना क्लब, व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी, आर्यन्स, नेहरू स्टेडियम, ब्रिलियंट्स क्रिकेट अकादमी, विरांगणा आणि बारणे क्रिकेट मैदानावर होणार आहे. या स्पर्धेतील उदघाटनाचा सामना सोमवार दि २२ नोव्हेंबर २०२१ ला पी वाय सी जिमखान्याच्या  मैदानावर खेळाला जाणार आहे.
  
अधिक माहिती देताना पीवायसी हिंदू जिमखान्याचे अध्यक्ष कुमार ताम्हाणे,  पीवायसी हिंदू जिमखानाचे मानद सचिव सारंग लागू व क्रिकेट विभागाचे सचिव विनायक द्रविड यांनी सांगितले की, या स्पर्धेत आयोजक पीवायसी हिंदू जिमखाना, डेक्कन जिमखाना,  पुना क्लब,व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी,केडन्स,क्लब ऑफ महाराष्ट्र, युनायटेड स्पोर्ट्स क्लब, ब्रिलियंट क्रिकेट अकादमी आर्यन्स क्रिकेट अकादमी, विजय क्रिकेट क्लब, केदार जाधव क्रिकेट अकादमी, अँबिशियस क्रिकेट क्लब, मेट्रो क्रिकेट क्लब याशिवाय एमसीएच्या 5 झोन संघामध्ये नॉर्थ झोन, वेस्ट झोन, साऊथ झोन, ईस्ट झोन आणि सेंट्रल झोन हे 18 संघ झुंजणार आहेत. 
 
फिल्ट्रमचे व्यवस्थापकीय संचालक निरंजन किर्लोस्कर यांनी सांगितले की, या स्पर्धेला प्रायोजित करून आम्हांला आनंद होत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून युवा खेळाडूंना आपली गुणवत्ता व कौशल्य सिद्ध करण्याची संधी मिळणार आहे.   
 
क्लबच्या क्रिकेट विभागाचे सचिव विनायक द्रविड पुढे म्हणाले की, ही स्पर्धा बाद पध्दतीने होणार आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून राज्यांतील खेळाडूंना सराव व्हावा या अनुषंगाने या स्पर्धेतील सामने तीन दिवसीय क्रिकेट सामने खेळविण्यात येणार आहेत. बाद फेरीतील विजेते संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. 
 
ते पुढे म्हणाले की, स्पर्धेतील विजेत्या संघाला करंडक देण्यात येणार  आहे. याशिवाय सामनावीर यासह स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज, सर्वोत्कृष्ट गोलंदाज, सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक आणि मालिकावीर यांनादेखील करंडक देण्यात येणार आहे. स्पर्धेचा उद्घाटनाचा व अंतिम सामना पीवायसी हिंदू जिमखान्याच्या क्रिकेट मैदानावर होणार आहे. 
 
स्पर्धेच्या  संयोजन समिती मध्ये विनायक द्रविड, सारंग लागू,  निरंजन गोडबोले, इंद्रजीत कामतेकर, पराग शहाणे,  दिपक गाडगीळ, कपिल खरे यांचा सहभाग आहे

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading