कर्तव्य फौंडेशन व सौरभ आमराळे यांच्या वाढदिवसानिमित्त नोकरी मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन

पुणे:कर्तव्य फौंडेशन व सौरभ भाऊ आमराळे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य नोकरी मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन 21 नोव्हेंबर रोजी सकाळी 9.00 ते दुपारी 3.00पर्यंत गाडीखाना हॉस्पिटल शुक्रवार पेठ ,पुणे येथे करण्यात आले आहे अशी माहिती सौरभ आमराळे यांनी पत्रकार परिषदेत दिली
युवकांना नोकरी मिळावी कोरोना काळात ज्यांना आपली नोकरी गमवावी लागली आहे त्यांना यात सुवर्णसंधी असणार आहे महाराष्ट्र राज्यातील सर्वाना या नोकरी महोत्सवात सामील होता येणार असून ज्यांना नोकरी जरी नाही मिळाली तरी आशा विद्यार्थ्यांना एक मेसेज रोज मिळणार असून पुण्यात किंवा राज्यात आपल्या क्षेत्रातील निगडित नोकरी मिळण्यासाठी माहिती मिळणार आहे
या नोकरी महोत्सवात 5 वी ते पदवी व विशेषतः सर्वच क्षेत्रातील नाविन्यपूर्ण विद्यार्थ्यांना नोकरीची संधी मिळणार आहे मार्केटिंग, ऍग्रीक्लुचरल,मेकानीक,सेल्समन क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना संधी मिळणार आहे. 
उमेदवारांनी येताना आपला बायोडाटाच्या पाच प्रति घेऊन येऊन नाव नोंदणीसाठी 9049027999/ 8767950599 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे
पत्रकार परिषदेला बाळासाहेब आमराळे, सौरभ आमराळे, धनश्री आमराळे, तुषार पठारे, तसमिया शेख, सुहास दाभाडे अभिजित चव्हाण उपस्थित होते.

Leave a Reply

%d bloggers like this: