Thursday, May 7, 2026
Latest NewsPUNE

प्रशांत जगताप यांनी केलेल्या टीकेला सभागृह नेते गणेश बिडकर यांचे प्रतिउत्तर

पुणे : संविधान दिनाच्या दिवशी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण आणि रयतेचा राजा असलेल्या श्री. छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे भूमीपूजन या कार्यक्रमासाठी अमित शहा पुण्यात येत आहेत. तो कार्यक्रम घेणे म्हणजे भाजपाच्या पायाखालची वाळू घसरणे आहे, असा विचार करणाऱ्या प्रशांत जगताप यांची आम्हाला कीव येते. सरंजामदारी मानसिकता असलेल्या पक्षाला संविधान दिनाचे काही देणेघेणे नाही, हे देखील स्वाभाविकच आहे. राष्ट्रवादीत राहून जगताप तुमची झेप फक्त सत्ता आणि निवडणूक यापुरतीच मर्यांदित झालेली आहे. पायाखालची वाळू कोणाची सरकते आहे, हे मार्च २०२२ मध्ये नक्कीच जगताप यांना समजेल. असे प्रतिउत्तरगणेश बिडकर, सभागृह नेता, पुणे महानगरपालिका यांनी दिले आहे. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading