Saturday, May 2, 2026
Latest NewsPUNE

शिवत्व प्रतिष्ठानतर्फे त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दीपोत्सव

पुणे, : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील शिवत्व प्रतिष्ठानतर्फे त्रिपुरारी पोर्णिमेनिमित ५००० पणत्या लावून दिपोत्सव साजरा केला. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठातील ज्या सेवकांची निधन झाले त्यांना हा दीपोत्सव समर्पित करण्यात आला.

या कार्यक्रमाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ. एन.एस.उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे, अधिष्ठाता डॉ. मनोहर चासकर, डॉ. पराग काळकर, अधिसभा सदस्य संतोष ढोरे, हनुमंत खांदवे पाटील तसेच विद्यापीठातील अधिकारी, प्राध्यापक, प्रशासकीय सेवक, संघटनेचे पदाधिकारी मोठया प्रमाणात उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष झांजरे, यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव सोमनाथ कंधारे यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष सुमित ढोरे यांनी मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading