व्हेर्सा नेटवर्क्स आणि जबिलच्या भागीदारीतून मेक इन इंडिया उपक्रमाला हातभार  

पुणे : व्हेर्सा नेटवर्क्स या सिक्युअर अ‍ॅक्सेस सर्व्हिस एजमधील आघाडीच्या कंपनीने आज जबिल या जागतिक उत्पादन सोल्युशन्स पुरवठादार कंपनीशी भागीदारीची घोषणा केली. देशातील मेक इन इंडिया उपक्रमाला मदत म्हणून आपल्या आघाडीच्या एसडी-वॅन उपकरणांचे उत्पादन करण्यासाठी व्हेर्सा नेटवर्क्सने हा करार केला आहे.मेक इन इंडिया उपक्रमाद्वारे  जागतिक स्तरावरील कंपन्यांना भारतात येण्यासाठी किंवा आपल्या उत्पादनाचा काही भाग भारतात स्थानिक स्तरावर उत्पादनाकरता खुला करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते.

व्हेर्सा नेटवर्क्सचे सिक्युअर एसडी-वॅन हे रूपांतरणात्मक तंत्रज्ञान आहे. हे तंत्रज्ञान, वापरकर्त्यांना आपल्या उपकरणांशी सुरक्षितपणे जोडून घेणारे व्हर्च्युअल वॅन आर्किटेक्चर देऊन, त्या माध्यमातून आयटी संरचनेचे नियंत्रण व व्यवस्थापन सुलभ करते.एसडी-वॅन सोल्युशनमध्ये एका नियंत्रक तसेच एका ब्रांच उपकरणाचा समावेश होतो. जेथे नियंत्रक   तैनात केलेला असतो असा क्लाउड किंवा डेटा सेंटरमधून ब्रांच उपकरण ऑपरेट केले जाते. जबिलचा भर ब्रांच उपकरणांच्या उत्पादनावर आहे. विशेषत: वैश्विक ब्रांच सीपीईचे  उत्पादन जबिल करते. ही उपकरणे सिक्युअर एसडी-वॅन सॉफ्टवेअर होस्ट करतात आणि व्हेर्साच्या सोल्युशनचा भाग म्हणून थर्ट-पार्टी सपोर्ट देतात.

ही उपकरणे व्हेर्सा ब्रॅण्डेड असली, तरी जबिलद्वारे थेट वितरकांना विकली जातात आणि वितरकांकडून पार्टनर्स व ग्राहक ती खरेदी करू शकतात.ऑगस्टमध्ये उत्पादनाला सुरुवात होणार आहे आणि जबिलच्या पुणे येथील उत्पादन कारखान्यांमध्ये आत्तापर्यंत तीन उत्पादनसंच निर्माण झाले आहेत. त्यामुळे सध्या स्थानिकांना ८० हून अधिक रोजगार पुरवणे कंपनीला शक्य झाले आहे. दर शैक्षणिक वर्षाला जबिल अनेक शैक्षणिक संस्थांमधून अप्रेण्टिसेस आणि पदवीधर प्रशिक्षणार्थींची नियुक्ती करते आणि परिसरातील कौशल्य विकासाला हातभार लावण्यासाठी अनेक कौशल्य सुधारणा प्रशिक्षण कार्यक्रम राबवते.

व्हेर्सा नेटवर्क्सच्या भारत व सार्क विभागाचे प्रादेशिक विक्री संचालक अभिषेक जैन म्हणाले की भारत ही व्हेर्सासाठी दुसऱ्या क्रमांकाची सर्वांत मोठी बाजारपेठ असल्यामुळे, सरकारच्या उपक्रमाच्या जोडीने, यावर्षी या भागात उत्पादक नियुक्त करणे हा महत्त्वाचा निर्णय आहे . त्याहून महत्त्वाचे म्हणजे नोकऱ्या व कौशल्ये अद्ययावत करण्याच्या संधींच्या माध्यमातून समाजाचे ऋण फेडणाऱ्या उपक्रमात सहभागी झाल्याचा तसेच भारताची अर्थव्यवस्था सुधारण्यात आमचा वाटा उचलल्याचा आम्हाला अभिमान आहे.

जबिल पुणे येथील ऑपरेशन्स संचालक सुनील नाईक  म्हणाले की क्लाउड, व्हर्च्युअलायझेशन, आयओटी तसेच आर्टिफिशिअल इंटेलिजन्स व मशिन लर्निंग यांचा वापर आदींमध्ये अलीकडेच झालेल्या क्रांतीमुळे एंटरप्राइज वॅन्समार्फत पास होणाऱ्या डेटा व ट्रॅफिकमध्ये प्रचंड वाढ झाली आहे आणि परिणामी कंपन्यांमध्ये नेटवर्किंगच्या दृष्टीने अनेक आव्हाने उभी राहिली आहेत,” असे   सांगतात. “व्हेर्साचे सिक्युअर एसडी-वॅन तंत्रज्ञान या आव्हानांवर मात करण्याची क्षमता व्यवसायांना देत आहे. व्हेर्साच्या वतीने सीपीई उपयोजनांचे उत्पादन करून या सोल्युशनचा एक भाग होण्याची संधी मिळणे व त्याचबरोबर ‘मेक इन इंडिया’ उपक्रमालाही हातभार लावण्याची संधी मिळणे हा रोमांचक अनुभव आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: