डॉ. अनिल बोंडेंकडून अमरावती हिंसाचाराचे समर्थन – नवाब मालिक

ऑडिओ क्लिप ट्वीट करीत नवाब मालिकांनी केला आरोप  

मुंबई : अमरावती येथे घडलेल्या हिंसाचाराला भाजप नेते अनिल बोंडे यांचे समर्थन असल्याचा आरोप अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे.  या संदर्भात आज नवाब मलिक यांनी एक ऑडिओ क्लिप ट्वीट केली आहे. त्यामुळे अमरावती दंगलीवरून पुन्हा एकदा राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

नवाब मलिकांनी शेअर केलेल्या ट्विटर स्पेसच्या ऑडिओ क्लिपमध्ये अनिल बोंडे म्हणतात की, गोध्रा दंगलीनंतर अहमदाबादेत दंगली झाल्या नाहीत. दरवर्षी अहमदाबादेत काहीतरी करून दंगली व्हायच्या. मात्र मोदी सरकार राज्यात सत्तेत आल्यापासून तिथे दंगली झाल्या नाहीत. देवेंद्र फडणवीस राज्यात मुख्यमंत्री होते, तेव्हा दंगली झाल्या नाहीत. भाजपाचं सरकार जिथे सत्तेस असतं तिथे दंगली करण्याची हिंमत कुणाची नसते. ज्या ठिकाणी सेक्युलर किंवा डाव्या विचारसरणीचं सरकार येतं त्या-त्या ठिकाणी दंगली होतात.

Leave a Reply

%d bloggers like this: