‘कंगना-गोखलें’च्या कृतघ्नतेच्या संस्काराचेच दर्शन – गोपाळदादा तिवारी 

पुणे :  ‘स्वतंत्र लोकशाहीरूपी भारताचा’ सर्वोच्च पुरस्कार घेतल्यानंतर मात्र “स्वतंत्र भारताची पायाभरणी करणाऱ्या” स्वातंत्र्य सैनिकांचाच् अवमान करत, कंगना रनौट हिने आपल्या कृतघ्नतेच्या संस्काराचाच दुसऱ्यांदा परीचय दिला असल्याचे, राजीव गांधी स्मारक समितीचे अध्यक्ष व काँग्रेसनेते गोपाळदादा तिवारी यांनी म्हटंले आहे. तसेच देशातील समंजस जनतेने या विकृतीकडे दुर्लक्ष करावे, असे आवाहन देखील गोपाळ तिवारी यांनी केले आहे.
मुंबईत आपल्या चित्रपटांची कारकीर्द करून नांव व पैसा मिळाल्यानंतर मात्र, याच ‘सिनेमातील पात्रा’ने,  “मुंबई पाकव्याप्त भाग असल्याचे” आरोप करून ‘महाराष्ट्र व आपल्या कर्मभूमी प्रती’ कृतघ्नताच व्यक्त केली होती.  त्यामुळे या “सिनेमा पात्राची” प्रेरणाच् पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आहेत काय? असा प्रश्न समोर येतो. कारण मोदीजींनी देखील “२०१४ पुर्वी, “भारतीय असल्याचे सांगण्यास शरम वाटायची” अशी मुक्ताफळे परदेशात जाऊन ऊधळली होती, असेही गोपाळ दादा तिवारी यांनी आपल्या प्रसिध्दी पत्रात म्हंटले आहे.
स्वातंत्र्याचे जननायक महात्मा गांधींचे राजकीय गुरू डॅा गोपाळकृष्ण गोखले हे पुण्याचे होते. याचे भान तरी विक्रम गोखले यांनी ठेवले पाहीजे होते. तसेच ख्यातनाम तबला वादक स्व . उस्ताद अहमद जान थिरकवा खान हे मुस्लिम धर्मिय असुन देखील ख्यातीप्राप्त तबलावादक सुर्यकांत गोखले यांचे निष्ठा समर्पित गुरू होते. त्यांनी देखील आपले पट्ट-शिष्य सुर्यकांत गोखले यांचेवर प्रेम करत तबलावादन शिकवले डॅा गोपाळकृष्ण गोखले व सुर्यकांत गोखले यांचे सोईस्करपणे विस्मरण करत,
 सिने कलाकार विक्रम गोखले यांनी देखील कंगनाच्या सुरात सुर मिसळून स्वातंत्र्य सेनानींचा अवमान करून, आपली कृतघ्नतेच्या संस्काराचीच ओळख ऊभ्या महाराष्ट्रास करून दिली.  राष्ट्रपिता महात्मा गांधीचे गुरू डॅा. गोपाळकृष्ण गोखले हे “पुणे शहरातील” असलेमुळे समस्त पुणेकरांना अभिमानास्पद होते. विक्रम गोखलेंच्या या “हिरवा – भगव्याच्या भाषा प्रयोगाने व स्वातंत्र्यसेनानींच्या अवनाकारक वक्तव्यामुळे” समस्त पुणेकरांची मान शरमेने खाली गेली असल्याचे देखील गोपाळदादा तिवारी यांनी म्हंटले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: