श्री संत नामदेव महाराज यांच्या जयंतीनिमित्त तब्बल ७५५१ किलो धान्यवाटप

पुणे: श्री संत नामदेव महाराज यांनी लहान वयातच पांडुरंगाला जेऊ घातले होते. आज मात्र त्या पांडुरंगाचे भक्त उपाशी आहेत. कोरोना महामारीच्या काळात सर्वाबरोबरच वंचित संस्थांना देखील अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. नेमकी हीच गरज ओळखून नामदेव समाज उन्नती परिषद पुणे शहर शाखेने धान्य वाटप हा सामाजिक बांधिलकीचा उपक्रम हाती घेत १९ सामाजिक संस्थांना ७५५१ किलो धान्य वाटप केले.

नामदेव समाजोन्नती परिषद पुणे शहरच्या वतीने श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या ७५१ व्या जयंती सोहळा वर्षानिमित्त म्हात्रे पूल येथील सृष्टी गार्डन येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते डॉ. मिलिंद भोई, माजी आमदार प्रकाश देवळे, नगरसेवक रवींद्र धंगेकर, नामदेव समाजोन्नती परिषदेचे अध्यक्ष संजीव तूपसाखरे, ना.स.प पुणे शहर अध्यक्ष संदीप लचके, उपाध्यक्ष संजय नेवासकर, मुख्य विश्वस्त रामचंद्र मेटे ,माजी विश्वस्त तु. पा. मिरजकर आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संयोजन सचिव सुभाष मुळे, रणजीत माळवदे, प्रदीप खोले, सोमनाथ मेटे, कुंदन गोरटे, विजय कालेकर, प्रशांत सातपुते, अक्षय मांढरे, दुर्गेश खुर्द, राहुल सुपेकर, अक्षय लचके, सुभाष पांढरकामे, स्वप्नील खुर्द यांनी केले. कार्यक्रमात डॉ. अभिजीत सोनवणे यांचा सन्मान करण्यात आला. संस्थेच्यावतीने त्यांना ५ हजार रुपयांची देणगी दिली.

या उपक्रमात आपले घर, एकलव्य न्यास, लुई ब्रेल आणि अपंग कल्याणकरी संस्था, संतुलन पाषाण, ममता फाउंडेशन, वंचित विकास, अनिकेत सेवाभावी संस्था, जीवन ज्योत मंडळ, संस्कार प्रतिष्ठान मतिमंद मुलींची निवासी शाळा, प्रा फाउंडेशन माहेर संस्था, साई गुरु सेवा संस्था, सोफोश श्रीवत्स, जीवन वर्धिनी संचलित मतिमंद विद्यालय, सार्थक अनाथालय, माया केअर सेंटर, सेवाधाम संस्था डोनजे, गुरुकृपा वारकरी विद्यार्थी सेवा ट्रस्ट भोर, पारधी समाज बीड या संस्थांना मदत करण्यात आली.

मिलिंद भोई म्हणाले, महाराष्ट्राला संतांची परंपरा लाभली आहे. संतांचे हे  विचार आजच्या तरुणांपर्यंत पोहोचले पाहिजेत, तर भरकटणारे तरुण त्यांचा आदर्श समोर ठेऊन चांगले काम करू शकतील. त्याकरिता शालेय अभ्यासक्रमात संतांचे धडे विद्यार्थ्यांना दिले पाहिजेत, असेही त्यांनी सांगितले.
आशिष गरड यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, प्रशांत सातपुते यांनी स्वागत केले, सुभाष मुळे यांनी आभार मानले.

Leave a Reply

%d bloggers like this: