मालमत्ता कर माफी योजनेच्या अंमलबजावणीसाठी शिवसेना आक्रमक  

पुणे : माजी सैनिकांनी देशासाठी प्राणाची बाजी लावून जीवाची पर्वा न करता निस्वार्थीपणे देशाचे संरक्षण केले आहे. त्यांनी केलेले देशाची सेवा व विविध स्तरावरुन प्राप्त झालेली मागणी विचारात घेता सर्व माजी सैनिकांचे मनोबल उंचावून त्यांना उचित सन्मान देण्याच्या दृष्टीकोनातून नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यक्षेत्रात वास्तव्य करणाऱ्या सर्व माजी सैनिकांना मालमत्ता करातून सूट देणे आवश्यक आहे. म्हणून राज्य सरकारने “मा.बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक व त्यांच्या विधवा पत्नीला मालमत्ता कर माफी योजना”, या योजनेंतर्गत नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यक्षेत्रात वास्तव्य करणाऱ्या सर्व माजी सैनिकांना मालमत्ता करातून सूट देण्याचा शासनाने निर्णय घेतला. मात्र पुण्यातील विविध आजी माजी सैनिकांच्या संस्थेने वारंवार पाठपुरावा करुनही सदरील मिळकत कराच्या माफीसाठी पुणे म.न.पा.ने प्रशासकीयदृष्ट्या कोणतेही ठोस पाऊल उचलल्याचे दिसत नाही. त्यामुळे पुणे शहर शिवसेनेच्यावतीने महानगरपालिका प्रवेशद्वाराजवळ आंदोलन करण्यात आले. यावेळी अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमणार यांना यासंदर्भात निवेदन देण्यात आले.

यावेळी पुणे शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, पुणे मनपा गटनेते पृथ्वीराज सुतार, उपशहरप्रमुख आनंद गोयल, प्रशांत राणे, भरत कुंभारकर, शहर संघटिका संगिता ठोसर, नगरसेवक बाळा ओसवाल, अविनाश साळवे, विशाल धनवडे, पल्लवी जावळे, युवासेना सहसचिव किरण साळी, मकरंद पेठकर, किशोर राजपूत, राजेश मोरे, राहुल जेगटे, सुरज लोखंडे, अनंत घरत, मनिष जगदाळे, चंदन साळुंखे, दिपक शेडे, मुकुंद चव्हाण, वैभव हनमघर, नंदू येवले, सनी गवते, योगेश पवार, श्रिकांत पुजारी, सचिन देडे, परेश खांडके, युवराज पारिख, प्रसाद चावरे उपस्थित होते.

संजय मोरे म्हणाले, पुण्यामध्ये एकूण अंदाजे वीस हजार मिळकतदारांना या निर्णयाचा लाभ होणार आहे. तसेच २०२१ हे वर्ष केंद्र शासनाने १९७१ च्या युद्धातील भारतीय सैन्य दलाने प्राप्त केलेल्या अभूतपूर्व विजयाला पन्नास वर्षे पूर्ण झाल्याने, सैन्यदलाचा सन्मान, कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरे करण्याचे योजिले आहे. परंतु भारतीय सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या या उपक्रमास फक्त आणि फक्त पुणे महानगरपालिकाच एक अपवाद असावी. पुण्याजवळील पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने सदर ठरावाची अंमलबजावणी ह्या वर्षापासून सुरुही केली आहे. महाराष्ट्रातील जवळ जवळ ९९% म.न.पा., न.पा., ग्रामपंचायत यांनी या योजनेची पूर्ण अंमलबजावणी केली आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने राज्य सरकारने सुरु केलेल्या योजनेला पुणे महानगरपालिका जाणूनबुजून दुर्लक्ष करत असल्याचा आरोप यावेळी मोरे यांनी केला. लवकरात लवकर या योजनेची अंमलबजावणी करण्यात यावी अन्यथा आम्हाला शिवसेना स्टाईलने याबाबत आवाज उठवावा लागेल असे शिवसेना पुणे शहर प्रमुख संजय मोरे म्हणाले.

Leave a Reply

%d bloggers like this: