fbpx
Monday, June 17, 2024
Latest NewsPUNE

वंदे भारतम नृत्य महोत्सवात नृत्य करून मिळवा प्रजासत्ताक दिन परेड २०२२ मध्ये परफॉर्म करण्याची संधी

पुणे :  मीनाक्षी लेखी, सांस्कृतिक मंत्रालयाच्या राज्यमंत्री, यांनी भारताच्या स्वातंत्र्याच्या ७५वर्षांच्या स्मरणार्थ आझादीच्या अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून ‘वंदे भारतम-नृत्य उत्सव’ सुरू केला.राजपथ, नवी दिल्ली येथे प्रजासत्ताक दिन परेड २०२२ मध्ये सांस्कृतिक कार्यक्रमादरम्यान अखिल भारतीय नृत्य स्पर्धेतील निवडक ४८० नर्तक सादर करतील. आझादी का अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून सांस्कृतिक मंत्रालयाने ‘वंदे भारतम-नृत्य उत्सव’ ही अखिल भारतीय नृत्य स्पर्धा सुरू करण्याची घोषणा केली आहे. या स्पर्धेचा मुख्य उद्देश देशभरातील उत्कृष्ट नृत्य प्रतिभांची निवड करणे आणि त्यांना प्रजासत्ताक दिन परेड २०२२ मध्ये सांस्कृतिक कार्यक्रमात सादरीकरण करण्याची संधी प्रदान करणे हा आहे. २६ जानेवारी२०२२ रोजी नवी दिल्ली येथील राजपथ, इंडिया गेट येथे अंतिम सादरीकरण केले जाईल.

१७ नोव्हेंबर २०२१ पासून जिल्हा स्तरावरील वंदे भारतम समूह नृत्य स्पर्धेच्या डिजिटल प्रवेशांना सुरुवात होणार आहे. सहभागी स्पर्धक शास्त्रीय, लोक, आदिवासी आणि फ्यूजन अशा चार नृत्य श्रेणींमध्ये नृत्य सादर करू शकतात यातून ४८०नर्तक विजेते म्हणून निवडले जातील. या कार्यक्रमासाठी खासकरून सांस्कृतिक मंत्रालयाने वेबसाईट आणि मोबाईल अँपलिकेशन विकसित केले असून त्यामध्ये कार्यक्रमाच्या सर्व बाबींचा समावेश असेल आणि स्पर्धेची माहिती लोकांना मिळेल. जिल्हा स्तरावरील सहभाग फक्त वेबसाइट आणि/किंवा मोबाईल अँपलिकेशनद्वारे स्वीकारला जाईल. ते स्पर्धेसंबंधी मार्गदर्शक तत्त्वे आणि इतर उपयुक्त माहिती प्रदर्शित करेल. सहभागी होण्यासाठी http://www.vandebharatamnrityautsav.in वर लॉग इन करा किंवा वंदे भारतम मोबाइल अँप डाउनलोड करा आणि तुमच्या नोंदी सबमिट करा.

सांस्कृतिक राज्यमंत्री, श्रीमती मीनाक्षी लेखी म्हणाल्या की माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या ७५व्या वर्धापन दिनाच्या समारंभात आपण आपली सांस्कृतिक महानता दाखवली पाहिजे यावर नियमितपणे भर दिला आहे. आझादी का अमृत महोत्सवाच्या माध्यमातून आपण ते साजरे केले पाहिजे, तसेच भारताच्या उज्ज्वल भविष्याचे दर्शन घडवले पाहिजे. आमच्या जुन्या परंपरागत संस्कृतीतून हे उत्सव नृत्य, देशभक्तीपर गाणी, लोरी आणि रांगोळ्यांनी भरले जावेत अशी कल्पना पंतप्रधान मोदीजींनी मांडली आहे.”पंतप्रधानांनी लोकसहभागाच्या भावनेने आझादीच्या अमृत महोत्सवाची कल्पना केली आहे .संपूर्ण भारतातील लोकांचा समावेश असलेले उत्सव आणि कार्यक्रम तळागाळापर्यंत नेणे महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर तरुणांना आपला वारसा आणि संस्कृतीशी जोडणे हा आझादी का अमृत महोत्सवाचा आवश्यक घटक असल्याचेही त्यांनी सांगितले. एक भारत श्रेष्ठ भारत या भावनेने संपूर्ण देशाला पुढे न्यायचे आहे , आपले भारतीयत्व एकत्र जपणे, हेच आझादी का अमृत महोत्सवाचे ध्येय आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading