fbpx
Monday, June 17, 2024
ENTERTAINMENTLatest News

स्वराज्य सौदामिनी ताराराणी मालिकेतून उलगडणार स्वराज्याच्या महाराणीचा इतिहास

मराठ्यांच्या मुली ज्या हाताने फुगडी खेळतात, त्याच हाताने गर्दनही मारू शकतात!’ ह्या उद्गारातून महाराणी ताराराणींची लढवय्या व्यक्तिमत्त्वाची झलक दिसली आहे. शिवछत्रपतींनी निर्माणकेलेल्या रयतेच्या स्वराज्याचे रक्षण करणाऱ्या  सर्वश्रेष्ठ वीरांगना ताराराणी यांचेयोगदान मोठे आहे  . त्यांचापराक्रम आणि जीवनकार्याची माहिती देणारा ताराराणींचा गौरवशाली इतिहास  सोनी मराठीवर  ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ या मालिकेतून उलगडत  आहे .

या मालिकेच्या निमित्ताने मालिकेतील   कलाकारांनी  कोल्हापूर येथील  ताराराणी चौकातील ताराराणींच्या पुतळ्याला अभिवादन केले .या परिसरात  आकर्षक फुलांची सजावट करत, ढोल ताशांच्या गर्जनात  कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज, इतिहासकार जयसिंगराव पवार आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे, सोनी मराठीचे बिझनेस हेड अजय भाळवणकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन आले. यावेळी  कलाकार स्वरदा थिगळे,संग्राम समेळ, रोहित देशमुख, अमित देशमुख, यतिन कार्येकर,आनंद काळे हे उपस्थित होते. याप्रसंगी छत्रपती शाहू महाराज यांनी स्वराज्य सौदामिनी ताराराणी मालिकेच्या टीमला शुभेच्छा दिल्या. 

जगदंब क्रिएशन्स निर्मित ही मालिका ताराराणींचा दुर्दम्य आत्मविश्वास, स्वराज्याप्रती अढळ निष्ठा, स्वराज्यासाठी केलेला त्याग आजच्या पिढीसमोर मांडणार आहे.  

 मालिकेचे निर्माते खासदार  डॉ. अमोल कोल्हे  म्हणाले की गेली३०० वर्ष महाराष्ट्र ज्या गोष्टीची वाट बघत होता तो इतिहास आज घराघरात या मालिकेद्वारे पोहचणार आहे .मूळ इतिहासाची प्रतारणा न करता मराठी मातीशी एकरूप होण्याचा प्रयत्न आम्ही या मालिकेमधून करत आहोत.  स्वराज्यच्या  इतिहासातील  या कर्तृत्ववानस्त्री चा इतिहास जो आत्तापर्यंत कुठेच पाहायला मिळाला नाही तोच इतिहास आम्ही यामालिकेद्वारे मांडण्याचा प्रयत्न करत आहोत . जीवात जीव आणि श्वासात श्वास असेपर्यंत हे स्वराज्य अबाधित राहील आणि त्या शैतान औरंग्याची कबर दख्खनच्या मातीत खोदली जाईल!’अशी स्वराज्याबद्दलची जाज्वल्य निष्ठा आणि करारीपणा व्यक्त करणाऱ्यारणरागिणी कर्तृत्ववान राजस्त्री  ताराराणींचा इतिहास उलगडण्याची संधी सोनी मराठीने आमच्या जगदंब क्रिएशन्सला दिली त्याबद्दल मी सोनी मराठीचे आभार व्यक्त करतो.  

यामालिकेत  ताराराणींच्या प्रमुख  भूमिकेत अभिनेत्री स्वरदा थिगळे आहे . मुघल साम्राज्यातील करारी नेतृत्व औरंगजेबाचे पात्र ज्येष्ठ अभिनेते यतीन कार्येकरसाकारत आहे . छत्रपती राजराम राजांची व्यक्तिरेखा संग्राम समेळ  करत आहे.   संताजी घोरपडे यांचे पात्र अमित देशमुख साकारताना दिसतआहे , तसेच  धनाजी जाधव यांची भूमिका रोहित देशमुख साकारत आहेत. हंबीररावमोहिते हे पात्र आनंद काळे यांनी रेखाटले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading