fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsPUNE

क्रांतीगुरू लहुजी साळवे स्मारक समितीच्या सदस्यपदी डॉ. राजू अडागळे

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या संगमवाडी येथील क्रांतीगुरू लहुजी साळवे स्मारक समितीच्या सदस्यपदी येरवडा भागातील सामाजिक कार्यकर्ते डॉ. राजू अडागळे यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. अडागळे हे विद्यार्थी दशेपासूनच सामाजिक चळवळींमध्ये सक्रीय सहभागी आहेत. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, मुंबई येथून त्यांनी पीएच.डी. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांनी शासकीय व अशासकीय संस्थांमधून विविध सामाजिक प्रश्नांवर संशोधन केले आहे. सध्या ते समाजकार्य विषयाचे प्राध्यापक म्हणून अध्यापनाचे काम करतात. समाजातील सुशिक्षित व अभ्यासू व्यक्तीची शासनाच्या क्रांतिगुरू लहुजी साळवे स्मारक समितीच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे विविध क्षेत्रातून अभिनंदन करण्यात येत आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading