उद्याच्या रोजगारसंधी देणाऱ्या शिक्षण पध्दतीची गरज : डॉ. रघुनाथ माशेलकर

पुणे : भारती अभिमत विद्यापीठाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित ज्येष्ठ शास्त्रज्ञ
डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या व्याख्यानास शनीवारी चांगला प्रतिसाद मिळाला. ‘रि- इन्व्हेंटिंग इंडियन एज्युकेशन, रिसर्च अॅण्ड इनोव्हेंशन सिस्टम ‘ या विषयावरील हे ऑनलाईन व्याख्यान ‘ डिस्टींग्विश्ड चेअर प्रोफेसर स्कीम ‘ अंतर्गत आयोजित करण्यात आले होते.

भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ आनंद भालेराव यांनी डॉ रघुनाथ माशेलकर यांचे स्वागत केले.

डॉ. माशेलकर म्हणाले, ‘ मानवी इतिहासात अनेक शोध लागले असले तरी शिक्षणाने भवितव्य घडते, हा मानवाला लागलेला सर्वात महत्वाचा शोध आहे. भारतात शिक्षणाला पूर्वापार प्रतिष्ठा आहे, ‘ राईट टू एज्युकेशन ‘ मुळे ही प्रतिष्ठा वाढली आहे. ‘ राईट टू एज्युकेशन ‘ बरोबर योग्य शिक्षण आणि शिक्षणाचा योग्य मार्ग पण महत्वाचा आहे. आताच्या जगात आता मिळणाऱ्या रोजगारासाठी , उदरनिर्वाहासाठी शिक्षण पद्धती राबवून उपयोगाची नाही, तर भावी काळात निर्माण होणाऱ्या रोजगारसंधीची शिक्षण पद्धती अंमलात आणली पाहिजे. शिक्षण आणि विज्ञान हातात हात घालून पुढे गेले पाहिजे. त्यातून उद्योजकता विकसित झाली पाहिजे. संधीची दारे स्वतःहून उघडली नाहीत तर नव्या संधी तयार केल्या पाहिजेत, असेही त्यांनी सांगितले.

डॉ. आनंद भालेराव म्हणाले, ‘ विद्यार्थांच्या शिक्षणविषयक नैमित्तीक गरजांकडे लक्ष देतानाच त्यांचा शैक्षणिक पाया भक्कम करण्याची गरज आहे. शिक्षण हे विद्यार्थी केंद्री असले पाहिजे.

Leave a Reply

%d bloggers like this: