Saturday, September 26, 2026
Latest NewsPUNE

महाराष्ट्र कल्चरल सेंटरच्या ‘अनलॉक नाट्य महोत्सवा’चे साहित्यिक रमेश इंगळे यांच्या हस्ते उद्घाटन

पुणे : प्रदीर्घ काळ बंद असलेली नाट्यगृहे उघडल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र कल्चरल सेंटरच्या ‘अनलॉक नाट्यमहोत्सवा’चे प्रसिद्ध साहित्यिक रमेश इंगळे उत्रादकर यांच्या हस्ते काल उद्घाटन झाले. विविध साहित्यकृतींवर आधारित तीन नाट्यप्रयोगांचे मंचन या महोत्सवात होत आहे.

महोत्सवाच्या पहिल्या दिवशी रमेश इंगळे उत्रादकर यांच्या ‘सर्व प्रश्न अनिवार्य’ या गाजलेल्या कादंबरीवर आधारित दोन अंकी नाटकाचे मंचन झाले. शिक्षणव्यवस्था आणि परीक्षांमध्ये चालणाऱ्या गैरप्रकारांवर गंभीर भाष्य करणारे हे नाटक प्रेक्षकांच्या भरघोस प्रतिसादात पार पडले.

महोत्सवात पुढे जी. ए. कुलकर्णी यांच्या ‘प्रदक्षिणा’ या कथेवर आधारित ‘अनुदिन अनुतापे’ आणि नील सायमन यांच्या ‘प्रिझनर ऑफ सेकंड अव्हेन्यू’ या गाजलेल्या कलाकृतीवर आधारित ‘Error Code 1005’ या दोन नाटकांचे मंचन होणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading