गडचिरोलीमध्ये पोलिस चकमकीत 26 माओवादी ठार

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील ग्यारापत्तीच्या जंगलात माओवादी आणि पोलिसांमध्ये चकमक झाली. या चकमकीत पोलिसांना तब्बल 26 माओवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले आहे. या वर्षभरातील ही सर्वात मोठी कारवाई आहे. यापूर्वी कसनासुर बोरीयाच्या चकमकीत 2018 मध्ये पोलिसांनी 38 माओवादयांना कंठस्नान घालले होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गडचिरोलीत आज सकाळी ग्यारापत्तीच्या जंगलात पोलीस आणि माओवादी यांच्यात चकमक सुरू झाली. धानोरा तालुक्यात मुरुम गावाजवळील जंगलामध्ये माओवादी मोठ्या संख्येने लपून बसले होते. हे सर्व माओवादी छत्तीसगडमधून आले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर माओवादी विरोधी पथकाने या परिसरात कोम्बिंग ऑपरेशन हाती घेतले. दिवसभर झालेल्या या चकमकीत जवानांनी 26 माओवाद्यांना ठार केले आहे. तसेच मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी दिली आहे.

दरम्यान, ग्यारापत्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मरदिनटोला जंगलात सकाळपासून ही चकमक सुरू होती. सकाळी पाच मृतदेह सापडले होते. अजुनही चकमक सुरू असल्याने मृतक माओवाद्यांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

फोटो- संग्रही

Leave a Reply

%d bloggers like this: