महानगरपालिका निवडणूकित कॉंग्रेसला आघाडीतून बाहेर काढण्याचा राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेचा थेट इशारा

पुणे : महापालिका निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर आलेल्या असतानाच; महाविकास आघाडीत पीएमआरडीएच्या नियोजन समिती निवडणुकीवरून फूट पडली आहे. निवडणूकीसाठी कॉंग्रसने राष्ट्रवादी तसेच शिवसेनेची विनंती धुडकावत पुण्यातून उमेदवार उभा केल्याने कॉंग्रेसने महापालिका निवडणूकांसाठी या तीनही पक्षात होणाऱ्या आघाडीत मिठाचा खडा टाकल्याचा आरोप राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केला आहे. तसेच राष्ट्रवादी आणि शिवसेना यांनी एकत्रित जाण्याचा सूचक संदेश देत वाटचाल केली असून त्यामुळे पुढील महापालिका निवडणूका शिवसेना व राष्ट्रवादी एकत्र येण्यात कोणतीही अडचण येणार नाही असे सांगत कॉंग्रेसला आघाडीतून बाहेर काढण्याचा थेट इशारा दिला आहे. 

जगताप म्हणाले की, पुणे आणि पिंपरी-चिंचवड नागरी क्षेत्रात असलेल्या 22 जागांसाठी 23 अर्ज आले. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपचे संख्याबळ, राष्ट्रवादीचे संख्याबळ आणि शिवसेनेची संख्या व अतिरिक्‍त संख्याबळ पाहता. 22 मध्ये राष्ट्रवादीचे 7 भाजपचे 14 शिवसेनेचा 1 सदस्य मतांच्या कोट्यानुसार निवडून जाणार हे अपेक्षित होते. पिंपरीत कॉंग्रेसचा एकही नगरसेवक नाही. पुण्यात 10 सदस्य आहेत. तर निवडून येण्याचा कोटा 13 मतांचा आहे. तरी सुद्धा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्ह्यातही कॉंग्रेसकडे एकूण संख्याबळ नसताना कॉंग्रेसला जिल्ह्यात एक जाऊ देऊ केली. त्यामुळे कॉंग्रेसने नागरी क्षेत्रात अर्ज भरणे अथवा उमेदवारी अर्ज ठेवणे अपेक्षित नव्हते. त्या पलीकडे जाऊन महापालिका निवडणुका येऊ घातल्या आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीत एकवाक्‍यता असणे आवश्‍यक आहे. अशी भूमिका कॉंग्रेसच्या काही नेत्यांनी घेणे अपेक्षित होते. मात्र तसे झालेले दिसत नाही. 

 

Leave a Reply

%d bloggers like this: