महागाई व केंद्र सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व भटक्या विमुक्त जाती जमातिचे  जागरण गोंधळ आंदोलन

पुणे: केंद्र सरकारने गेल्या दोन-तीन वर्षांपासून पेट्रोल डिझेल व जीवनावश्यक वस्तूंचे दर याचे दर वाढवले आहेत. कोरोनामध्ये असंख्य नागरिकांचे रोजगार गेले. त्यात केंद्र सरकारने महागाईचे दर वाढवले त्यामुळे सर्व सामान्य नागरिकांना फटका बसला आहे. त्यामुळे आज महागाई व केंद्र सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व भटक्या विमुक्त जाती जमातिने जागरण गोंधळ घालून आंदोलन केले.

पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या येथील शेजारी ग्राउंडवर हे आंदोलन करण्यात आले. या जागरण गोंधळ आंदोलनाच्या वेळी जागरण गोंधळ करून केंद्र सरकारचा निषेध वक्त करण्यात आला. या जागरण गोधळ आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केले.
या जागरण गोधळ आंदोलनाच्या वेळी राष्ट्रवादी गोविंद गंगाराम पवार अध्यक्ष पुणे शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी,प्रदीप देशमुख,उदय महाले,राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे पुणे शहरातील कार्यकर्ते व पदाधिकारी, व भटक्या विमुक्त जाती जमातीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रशांत जगताप म्हणाले, या केंद्र सरकारने ओबीसी व मराठा समाजाला जे आरक्षण पाहिजे होते .ते दिले नाही.भटक्या विमुक्त जाती जमातिकडे पण केंद्र सरकारने लक्ष दिले नाही.केंद्र सरकारने महागाई चे दर वाढवले त्यामुळे सर्व सामान्य नागरिकांना पटका बसला आहे.केंद्र सरकारने लक्ष दिले पाहिजे.पण ते देत नाही.आज आम्ही केंद्र सरकारला इशारा देतो की जर.केंद्र सरकारने लक्ष दिले नाहीतर येतून पुढील काळात आम्ही राज्यभर आंदोलन करणा र.

Leave a Reply

%d bloggers like this: