उद्या राज्यात मुसळधार पावसाची शक्यता; सातारा, कोल्हापूर, सिंधुदूर्ग जिल्ह्याल्या यलो अलर्ट

पुणे : दक्षिण भारतात पावसाचा कहर सुरू असून आता महाराष्ट्राला देखील हवामान विभागा कडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उद्या (१२ नोव्हेंबर) राज्यातील सातारा, कोल्हापूर आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे; तर १३ आणि १४ नोव्हेंबर रोजी राज्यातील पुणे, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर,सांगली,सातारा,सोलापूर,उस्मानाबाद,बीड आणि लातूर  जिल्ह्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे. 

हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, येत्या दोन दिवसात दक्षिण कोकणात सर्वाधिक पावसाचा जोर पहायला मिळेल. त्याचप्रमाणे मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, पुण्यासह ११ जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. उद्या (१२ नोव्हेंबर) राज्यातील सातारा, कोल्हापूर आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे तर १३ आणि १४ नोव्हेंबर रोजी राज्यातील पुणे, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर,सांगली,सातारा,सोलापूर,उस्मानाबाद,बीड आणि लातून जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. विकेंडला राज्यात होणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यात वाहणाऱ्या वाऱ्याचा वेग हा ताशी ३० ते ४०० किमी इतका राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. 

पुण्यात विकेंडला मुसळधार पावसाची शक्यता 

मागील काही दिवस पाऊस पुणे शहरात हजेरी लावत असला तरी गेल्या दोन दिवसात पुणेकर गुलाबी थंडीचा आनंद घेत आहेत. काल पुण्याच्या हवेली येथे १०.३ अंश सेल्सिअस या किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे. हवामान विभागा कडून या विकेंडला पुण्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

Leave a Reply

%d bloggers like this: