Friday, May 15, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNE

या आठवड्यात राज्यात कोकण, घाट परिसर, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात मेघगर्जनेसह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता


पुणे:उत्तर पूर्व परिसरात हवेचा दाब वाढल्याने राज्यात किमान तापमानात बरीच घट झाली असून दोन तीन दिवसांत पुण्यात देखील तापमानाचा पारा घसरला आहे. राज्यात सर्वात कमी किमान तापमानाची नोंद पुण्यात झाली आहे. पुणे जिल्ह्यातील हवेली याठिकाणी सर्वात कमी 10.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. 
तर तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टी परिसरात सध्या हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाला असून पुढील एक-दोन दिवसांत हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे 11 नोव्हेंबरपर्यंत राज्यात
हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे तसेच नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. याचा काही परिणाम महाराष्ट्रावर देखील दिसून येणार आहे.
  या सप्ताहांत महाराष्ट्रातील कोकण, घाट परिसर, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात मेघगर्जनेसह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याने 13 नोव्हेंबर आणि 14 नोव्हेंबर पुण्यासह एकूण 11 जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading