भाजप वकील आघाडीची संघटनात्मक बैठक संपन्न
दौंड : नुकताच भारतीय जनता पार्टीचे नेते वकील आघाडी चे जिल्हाध्यक्ष – ॲड. संजय सावंत पाटील यांच्या दौंड दौरा संपन्न झाला. या दरम्यान वकील आघाडी ची संघटनात्मक बैठक घेतली, या भेटी वेळी स्वच्छ भारत अभियान पदाधिकारी, अभिवक्ता परिषदेचे सदस्य, भाजप वकील आघाडी जिल्हा व तालुका पदाधिकारी, महिला मोर्चा पदाधिकारी सर्वाची भेट घेतली तसेच बैठकीत सर्वाना संबोधण्यात आले तसेच दौड न्यायालयातील सर्व इतर वेगवेगळ्या क्षेत्रातील सामाजिक व राजकीय क्षेत्रातील काम करणाऱ्या वकीलांना भेटून वकील वर्गातील महत्त्वाच्या स्थानिक गोष्टीवर सविस्तर चर्चा करण्यात आल्या व शक्य होईल तेवढे मार्गदर्शन करण्यात आले, सर्वासमोर ग्वाही दिली भाविष्यात कायमच एकञित मिळून सर्व आभियान चालवू. तसेच दौरा दरम्यान जिल्हाध्यक्ष ॲड. सावंत यांनी बार अध्यक्ष ॲड. उद्य फडतरे – देशमुख सर, यांची आवर्जून भेट घेऊन भाजप मधील जुन्या आठवणीना उजाळा दिला.
यावेळी उपस्थित मान्यवर भाजपा तालुका कायदा अध्यक्ष ॲड. श्रीकांत गुंड, दौंड शहर अध्यक्ष कायदा आघाडी ॲड. रमेश आठवले, ॲड. भुषण दिवेकर, ॲड.पोपट गवळी, ॲड. संतोष भोईटे, ॲड. अजित दोरगे, ॲड. अनंता कुलकर्णी, ॲड. अजित गायकवाड, ॲड. संकेत भंडारी, ॲड. अजय डेंगले, ॲड.शाहू शितोळे, ॲड. जमिर शेख, ॲड. एल जे हक्के तसेच महिला मौर्चा च्या सक्रीय जिल्हा कमीटी सदस्या मिनाताई जाधव यांच्या सोबतच सर्वच मान्यवरांच्या जिल्हाध्यक्ष ॲड संजय सावंत यांनी भेटी गाठी घेतल्या.
