राज्यात बुधवारी 1094 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

मुंबई – कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या दैनंदिन संख्येत चढ उतार पाहायला मिळत आहे. राज्यात बुधवारी 1094 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 1976 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 64 लाख 63 हजार 932 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.64 टक्के आहे.

राज्यात आज 17 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 12 हजार 410 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात 1,29,714 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 870 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6, 35 , 22, 546 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: