एसटी कामगारांच्या न्याय हक्कासाठी संभाजी ब्रिगेड सरकार विरोधात सर्वतोपरी लढा देणार… – अॕड. मनोज आखरे

पुणे : विधानसभेच्या निवडणुकीच्या काळात पक्षाचा जाहीरनाम्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष मा. शरद पवार यांनी एसटी कामगारांच्या सर्व मागण्या पूर्ण करणार असा शब्द दिला होता. ST कामगारांच्या अधिवेशनात सुद्धा हाच शब्द दिला होता. परंतु महाविकास आघाडी च्या रूपाने सत्तेवर येऊन सुद्धा पवार साहेबांनी शब्द पाळला नाही. 36 कर्मचाऱ्यांनी आंदोलनात आत्महत्या केल्या. याला जबाबदार कोण…? राज्यसरकारने कामगारांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये. तात्काळ राज्य सरकार मध्ये एसटी महामंडळाच्या कामगारांचा विलीनीकरण करावे अशी संभाजी ब्रिगेडची ठाम भूमिका आहे. यासाठी दोन दिवसात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सुद्धा संभाजी ब्रिगेडचे शिष्टमंडळ भेटणार आहे असे मत संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष अॕड. मनोज आखरे यांनी व्यक्त केले.

राज्यात जर खाजगी ड्रायव्हरला 35 ते 40 हजार रुपये पगार मिळू शकतो तर मग एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना इतका कमी पगार का…? त्यांनी तुटपुंज्या पगारात स्वतःचा संसार कसा चालवायचा…? सध्या महाराष्ट्रात आंदोलन सुरू असल्यामुळे राज्य सरकारने सूडबुद्धीने बऱ्याच कामगारांचं निलंबन केले आहे, ते तात्काळ थांबून सर्व कामगारांना सेवेत पूर्ववत करावा अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या स्टाइलने महाराष्ट्रात आंदोलनाचा उद्रेक होईल आणि याची सर्व जबाबदारी राज्य सरकारची असेल. सरकारने वेळकाढू पणा करू नये.

शिवाजीनगर एसटी कामगारांच्या आंदोलनासाठी आज संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष ॲड मनोज आखरे यांनी स्वतः प्रत्यक्ष भेट देऊन आंदोलनास पाठिंबा दिला व सोबत राहण्याचे आश्वासन दिले यांच्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संभाजी ब्रिगेड आंदोलनात उतरणार आहे.

यावेळी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे, विभागीय अध्यक्ष किरण घाडगे, जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे, शहराध्यक्ष अविनाश मोहिते, सचिव संदीप कारेकर, जिल्हा उपाध्यक्ष महादेव मातेरे, कार्याध्यक्ष दिनकर केदारी, सनी देशमुख, शकील शेख, निलेश ढगे, अंकुश हाके, सुनिल केडसे, राजू सरवदे, अमर शिंदे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

%d bloggers like this: