Pune – उच्चभ्रू सोसायटीत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, दोघींची सुटका, एजंट अटकेत

पुणे : पुण्यातील बिबवेवाडी परिसरातील उच्चभ्रू सोसायटीतील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. बिबवेवाडी पोलिसांकडून दोन एजंटना अटक करण्यात आली आहे. हायप्रोफाईल रहिवासी इमारतीत चाललेल्या अनधिकृत धंद्यांमुळे एकच खळबळ उडाली आहे.

पुण्यातील बिबवेवाडी परिसरात उच्चभ्रू सोसायटीत सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा बिबवेवाडी पोलिसांनी पर्दाफाश केला. येथील दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून वेश्या व्यवसाय चालवणार्‍या दोघांना अटक करण्यात आली आहे.

महेंद्र ज्ञानाराम प्रजापती (वय 34 वर्ष, रा. सुपर इंदिरानगर, बिबवेवाडी, मूळ गाव सोजत, जि. पाली, राजस्थान), पांडुरंग लक्ष्मण शिंदे (वय 46 वर्ष, रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) अशी अटक केलेल्या एजंटची नावे आहेत.

Leave a Reply

%d bloggers like this: