फडणवीस यांनी केलेले सर्व आरोप बिनबुडाचे; उद्या हायड्रोजन बॉम्ब फोडणार – नवाब मलिक

मुंबई : देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यावर केलेले सर्व आरोप बिनबुडाचे आहेत. माझे अंडरवर्ल्डशी कोणत्याही प्रकारचे कनेक्शन नाही. याउलट देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांचे अंडरवर्ल्डसोबत कनेकशन होते. याचा हायड्रोजन बॉम्ब उद्या सकाळी आपण फोडणार असल्याचे  अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले.

आज सकाळीच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्यावर अंडरवर्ल्डशी संबंधीत लोकांकडून गोवावाला कंपाऊंडची जागा कमी दरात खरेदी केल्याचा आरोप केला होता. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत नवाब मलिक बोलत होते.

मलिक म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनी राईचा पर्वत बनवला आहे. बिनबुडाचे आरोप केले आहेत. त्यांना देण्यात आलेली माहिती चुकिची आहे. आम्ही बॉम्बस्फोटातील आरोपींकडून जमीन खरेदी केल्याचा आरोप फडणवीसांनी केला होता. मात्र देवेंद्रजी १९९९ ला तुम्ही या शहरात पहिल्यांदा आमदार म्हणून आलात. यापूर्वी मुंडे साहेबांनी अनेकांचे तार दाऊदशी जोडले. मात्र ६२ वर्षांच्या कार्यकाळात किंवा २६ वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत असे आरोप कोणी सिद्ध करु शकले नाहीत. मी कोणत्याही अंडरवर्ल्डच्या माणसांकडून जमीन विकत घेतलेली नाही. तसेच ती कवडीमोल किंमतीतही विकत घेतलेली नाही. फडणवासांनी आरोप केलेल्या जमीनीची खरेदी कायद्यानुसार झाली आहे.  फडणवीस यांनी कोणत्याही यंत्रणेकडे जावं, चौकशीसाठी तयार आहे.

दरम्यान, उद्या सकाळी १० वाजता देवेंद्र फडणवीस यांचे अंडरवर्ल्डसोबत काय खेळ सुरू आहे. तसेच ते मुख्यमंत्री असताना कशाप्रकारे पूर्ण शहराला हॉस्टेज बनवले होतं, त्याविषयी मी माहिती देईन.

Leave a Reply

%d bloggers like this: