नवाब मलिकांच्या कुटुंबीयांनी अंडरवर्ल्डशी संबंधित लोकांकडून जमीन खरेदी केली – देवेंद्र फडणवीसांचा गंभीर आरोप

मुंबई:  मी जे सांगणार आहे ते सलीम – जावेद यांच्या सिनेमाची  कथा नाही. तो मध्यंतरानंतरचा नंतरचा चित्रपटही नाही. हा एक देशाच्या सुरक्षेबद्दलचा प्रश्न आहे, असे सांगत  देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्या कुटुंबीयांवर खळबळजनक आरोप केले आहेत. नवाब मलिकांच्या कुटुंबीयांकडून अंडरवर्ल्डच्या लोकांकडून जमीन खरेदी केली असल्याचा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी आज केला आहे.

फडणवीस म्हणाले, सरदार शहाबली खान हा 1993 बॉम्बस्फोट प्रकरणात गुन्हेगार आहेत. त्यांना जन्मठेप झाली आहे ते तुरुंगात आहेत. त्यांची शिक्षा सुप्रीम कोर्टाने कायम केली आहे. सरदार शहाबली खान याच्यावर टायगर मेमन याच्या नेतृत्त्वात मुंबई महापालिका आणि बॉम्बे स्टॉक एक्सेंजमध्ये बॉम्ब ठेवण्यासंदर्भात चर्चा झाली होती. टायगर मेमनच्या घरी बैठक झाली होती. टायगर मेमनच्या गाडीत आरडीएक्स भरलं गेलं त्यामध्ये सरदार शहाबली खानचा समावेश होता. सरकारी साक्षीदारानंतर त्यांना शिक्षा भोगावी लागत आहे.

तसेच, सलीम पटेल हा हसीना पारकरचा ड्रायव्हर होता. 2007 मध्ये हसीना पारकरला अटक झाल्यानंतर सलीम पटेलला अटक करण्यात आली होती. दाऊद फरार झाल्यानंतर हसीना पारकरच्या नावावर संपत्ती जमा करण्यात येत होती. सलीम पटेलच्या नावावर पॉवर ऑफ अटर्नी करण्यात येत होती, असा दावा फडणवीस यांनी केला.

दरम्यान, कुर्ला येथे तीन एकर जमीन 1 लाख 23 स्क्वेअर फुट जमीन होती. ही जमीन एलबीएस रोडवर आहे. ही जमीनची नोंदणी सॉलिडस नावाच्या कंपनी सोबत झाली आहे. या जमिनीची पॉवर ऑफ अटर्नी सलीम खान याच्या नावावर आहे. विक्री सरदार शहा वली याच्या नावावर आहे. सॉलिडस कंपनी नवाब मलिक यांच्या परिवाराची आहे. या कागदपत्रावरील सही फराज मलिक यांची आहे.  याच ठिकाणच्या फोनिक्स मार्केटच्या जमिनीची खरेदी झाली 2053 रुपये स्वे. फीटने झाली. अंडरवल्डच्या लोकांकडून घेतलेली जमीन 3 एकर खरेदी झाली 30 लाखात, त्यातील 20 लाखांचंच पेमेंट झालं. यातील सलीम पटेलला 15 लाख मिळाले आणि 10 लाख शाह वली खान म्हणजेच सरदार खानला मिळाले, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 

Leave a Reply

%d bloggers like this: