राज्य सरकारने तातडीने पेट्रोल, डिझेलवरील कर कमी करण्याच्या मागणीसाठी भाजपचे आंदोलन

पुणे : देशात पेट्रोल,डिझेलचे दर वाढल्यामुळे सर्वसामान्याच आर्थिक गणित कोलमडले गेल्यामुळे महागाईने पुन्हा एकदा डोक वर काढल होत.दिवसेदिवस वाढणाऱ्या या दरवाढीमुळे नागरिकही ञस्त झाले होते.त्यांना दिलासा देण्याकरता केंद्र सरकारने आपल्या अधिकारातील पेट्रोल,डिझेल वरील कर पाच ते आठ रुपयांनी कमी करुन नागरिकांना काहीसा दिला.त्यानंतर भाजपप्रणित राज्य सरकारने तातडीने राज्य सरकारच्या अधिकारतील कर कमीही केला पण महाराष्ट्र राज्य सरकारने अजुनही कर कमी केले नाही .या निषेधार्थ पुणे शहर भाजपच्यावतीने मंडई परिसरात आंदोलन केल .
या आंदोलनाचे नेतृत्व भाजपचे पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केले.

या आंदोलनात राज्य सरकारने पेट्रोल डिझेल वरील कर कमी केले नाही म्हणून राज्य सरकारचा निषेध भाजप तर्फे करण्यात आला. या आंदोलनाला भाजपचे नगरसेवक धनंजय जाधव,
गणेश घोष ,एडवोकेट संजय पाटील, भाजपचे पुणे शहरातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जगदीश मुळीक म्हणाले,केंद्र सरकार विरुद्ध मा विकास आघाडीतील काही पक्ष केंद्र सरकारने पेट्रोल डिझेलचे दर कमी केले नाही आंदोलन करत होते. केंद्र सरकारने पेट्रोलचे डिझेलचे दर कमी केले आहेत. राज्य सरकारने तातडीने पेट्रोल,डिझेलवरील कर कमी करुन राज्यातील जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी केली. म्हणून आम्ही आंदोलन करत आहोत. असेजगदीश मुळीक म्हणाले.

Leave a Reply

%d bloggers like this: