राज्यात जवळपास ११९ डेपोत संप, नागरिकांची गौरसोय

पुणे : एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून राज्यभर एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. आता या संपांची व्याप्ती वाढली असून राज्यात जवळपास ११९ डेपोंमध्ये संप सुरू आहे. त्यामुळे गावाकडे प्रवास करणाऱ्या असंख्य नागरिकांचे गौरसोय झाली आहे. तसेच एसटीला रोज जवळपास ४ कोटींचा फटका बसत आहे. 

दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांच्या कृती समितीने राज्यभर संप केला. यात त्यांनी महागाई भत्ता, घरभत्ता यासह एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करण्यात यावे, ही प्रमुख मागणी केली होती. त्यापैकी महागाई भत्ता व घर भत्ता वाढविण्याची मागणी मान्य झाली. मात्र विलीनीकरणाची मागणी मान्य झाली नाही. त्यामुळे २७ ऑक्टोबरपासून एसटी कर्मचाऱ्यांकडून संप पुकारण्यात आला आहे.  संपामुळे सुरुवातीला १० ते २० डेपो बंद होते आता त्यांची संख्या ११९वर पोहचली आहे. विदर्भ, मराठवाड्यापुरते मर्यादित असणारा संप आता पुणे, मुंबईला देखील होत आहे. पुणे जिल्ह्यात नारायणगाव, राजगुरूनगर ,इंदापूर या तीन आगारात एसटीचा १०० टक्के संप झाला. अनेक डेपोमध्ये तिकीट रिसर्वेशनचे पैसे परत देण्यास सुरूवात केली आहे.    

दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे एसटी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. गावाकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. 

एसटी कर्मचाऱ्यांचा संप बेकायदेशीर 

”एसटी कर्मचाऱ्यांनी संपाचे नोटीस दिली आहे. मात्र हा संप बेकायदेशीर आहे. यावर तोडगा काढण्यासाठी महामंडळ प्रयत्नशील आहे.” 

ज्ञानेश्वर रणवरे  (पुणे विभागीय वाहतूक अधिकारी, राज्य परिवहन महामंडळ)

 

Leave a Reply

%d bloggers like this: