एसटी संप : खाजगी ट्रॅव्हल्स कडून प्रवाश्यांच्या खिशयावर डल्ला

पुणे : राज्यभर सुरू असलेल्या एसटी कारमाचाऱ्यांच्या संपाची धग आता मुंबई, पुण्यापर्यंत येऊन पोहचली आहे. आज पुणे जिल्ह्यात नारायणगाव, राजगुरूनगर ,इंदापूर या तीन आगारात एसटीचा १०० टक्के संप झाला. तर अनेक डेपोंमध्ये तिकीट रिसर्वेशनचे पैसे परत देण्यास सुरूवात केली आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा हा संप खाजगी वाहतूकदारांच्या पथ्यावर पडला असून खाजगी वाहतूक दारांकडून प्रवाश्यांची लूट सुरू आहे.    

पुणे शहर आणि जिल्ह्यातील नारायणगाव आणि खेड (राजगुरूनगर) वगळता अन्य सर्व आगारामधून नियमितपणे गाड्या सुरू होत्या. बाहेरूनही अनेक गाड्या प्रवाशांनी भरून येत होत्या. तर पुणे स्टेशन, शिवाजीनगर आणि स्वारगेट आगारातून एसटी वाहतूक सुरू होती. एसतीची संख्या कमी असल्याने येथे मोठ्या संख्येने प्रवाश्यांनी गर्दी केली होती. पुणे, मंबईतून दिवाळीनिमित्त गावाकडे गेलेला नागरिक पुन्हा मुंबई-पुण्याकडे परतू लागले आहेत. परंतु एसटीच नसल्याने त्यांना खाजगी बसचा पर्याय निवडावा लागत आहे. तर या संपाचा गैरफायदा घेत खाजगी वाहतूक दारांनी गाडीभाड्यात तिप्पट-चौपट वाढ केली आहे.   

खासगी ट्रॅव्हल्सचे वाढीव दर

पुणे ते मुंबई ६०० ते ७००

पुणे ते औरंगाबाद ७०० रूपये

पुणे ते नागपूर १५०० ते १८०० रूपये

शिवाजीनगर ते अमरावती १५०० रूपये

पुणे ते उस्मानाबाद ११०० रूपये

पुणे ते लातूर १२०० रूपये

पुणे ते बीड १००० रूपये

पुणे ते वर्धा १२०० रूपये

पुणे ते नाशिक ५०० ते ६०० रूपये

(फोटो- संग्रही) 

 

 

 

Leave a Reply

%d bloggers like this: