राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करा – संभाजी ब्रिगेड

पुणे : महाराष्ट्राची रक्तवाहिनी म्हणून एसटी महामंडळाकडे पाहिला जातं. “हात दाखवा, गाडी थांबवा…” म्हणणारी एसटी आज मात्र दिवाळीसारख्या सणासुदीच्या काळात बंद आहे. एसटीची कर्मचारी प्रवाशांना वेठीस धरत आहेत तर राज्य सरकार एसटी कर्मचाऱ्यांना वेठीस धरत आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या रास्त मागणी आहे की, १) एसटी महामंडळाचं राज्य सरकार मध्ये विलीनीकरण करा. २) एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करा… या व अशा असंख्य मागण्या कर्मचाऱ्यांच्या आहेत मात्र राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब साहेब याकडे जाणीवपूर्वक लक्ष देत नाही. यांच्याच पक्षाच्या कर्मचाऱ्यांच्या संघटना सरकारला मॅनेज झालेले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेएक शब्द बोलायला तयार नाहीत. सरकार व मंत्री झोपलेत का…? म्हणून महाराष्ट्रात ३२ एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. याला जबाबदार कोण…? तात्काळ एसटी कर्मचाऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य कराव्यात अशी संभाजी ब्रिगेडची मागणी आहे. याच मागण्यांसाठी 2017 मध्ये सुद्धा आंदोलन झाले होते. त्यावेळी सुद्धा संभाजी ब्रिगेड ने महाराष्ट्रभर आंदोलन केले होते. सरकार शब्द देते परंतु ते पाळत नसल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या असंतोषाचा उद्रेक झालेला आहे. त्यांच्या भावनेशी खेळू नका. अन्यथा महाराष्ट्रात रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करावे लागेल असा इशारा संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी आज दिला.

सरकारच्या गलथान कारभारामुळे आणि त्रासामुळे संतोष माने जन्माला येतो हे सरकारने लक्षात घ्यावे. एसटी कर्मचाऱ्यांच्या विरोधात राज्य सरकार हे मोगल किंवा निजमा सारखे वागत आहे, हे दुर्दैवी असून 32 आत्महत्या कर्मचाऱ्यांना जबाबदार कोण…? परिवहन मंत्र्यांवर ST कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या प्रकरणी गुन्हा दाखल का करू नये, तो केलाच पाहिजे. कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा अशी संभाजी ब्रिगेडची मागणी आहे. आम्ही एसटी कर्मचार्‍यांच्या पाठीशी खंबीरपणे आहोत…

 

Leave a Reply

%d bloggers like this: