Saturday, September 26, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

Ahmednagar Fire – ICU मध्ये आग लागून १० कोरोना रुग्णांचा मृत्यू

अहमदनगर : येथील शासकीय रुग्णालयात लागलेल्या भीषण आगीत १० कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत संपूर्ण नगर जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. रुग्णालयातील अतिदक्षता विभागालाच ही आग लागली. शॉटसर्किमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. 

अहमदनगर जिल्हा रुग्णालयालयातील अतिदक्षता विभागाला लागलेल्या भीषण आगीत 10 रुग्णांचा मृत्यू झालाय. तर एक रुग्ण गंभीर जखमी झाला आहे. अतिदक्षता विभागात एकूण 17 रुग्णांवर उपचार सुरु होते. या घटनेनं राज्यात एकच खळबळ उ

डाली आहे. नाशिकमध्ये झालेल्या ऑक्सिजन गळतीच्या घटनेनंतर ही दुसरी मोठी दुर्घटना आहे. दरम्यान रुग्णालयाच्या फायर ऑडिटमध्ये त्रुटी असल्याचा आरोप स्थानिक आमदार संग्राम जगताप यांनी केलाटय. तर हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवलर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी जगताप यांनी केलीय.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे तातडीने कोल्हापूरवरुन नगरकडे रवाना झाले आहेत. शॉटसर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनास्थळावर जाऊन पाहणी करणार. तसंच मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना तातडीने सरकारी मदत दिली जाणार असल्याची माहिती मुश्रीफ यांनी दिलीय. तसंच आगीला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याचंही मुश्रीफ यांनी सांगितलं.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading