भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक व द्रोणाचार्य पुरस्कार विजेते तारक सिन्हा यांचे निधन

नवी दिल्ली : भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक व द्रोणाचार्य पुरस्कार विजेते तारक सिन्हा यांचे आज दिर्घ आजाराने निधन झाले.  आज पहाटे तीन वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. ते 71 वर्षाचे होते. ज्येष्ठ क्रीडा पत्रकार विजय लोकपल्ली यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. सिन्हा यांच्या निधनाची बातमी कळताच क्रिडा विश्वात शोककळा पसरली आहे.

तारक सिन्हा यांच्या भारतीय संघाचे प्रशिक्षक काळात जवळपास 12 क्रिकेटपटूंनी भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे.  तर 100 पेक्षा अधिक क्रिकेटपटूंना त्यांनी घडवले आहे. सिन्हा यांच्या मार्गदर्शनाखाली शिखर धवन, रिंदर खन्ना, रंधीर सिंह, रमन लांबा, मनोज प्रभाकर, अजय शर्मा, केपी भास्कर, अतुल वासन, आशीष नेहरा, संजीव शर्मा, आकाश चोप्रा आणि ऋषभ पंत हे 12 खेळाडू टीम इंडियाकडून खेळले आहेत. त्याचबरोबर महिला क्रिकेटपटूंमध्ये अंजूम चोप्रालाही त्यांनी मार्गदर्शन केले होते.

Leave a Reply

%d bloggers like this: