क्रूझ ड्रग्ज प्रकरण – सुनील पाटील राष्ट्रवादीचा कार्यकर्ता भाजपच्या मोहित कंबोज यांचा आरोप

मुंबई : क्रूझ ड्रग्ज प्रकरणात  सुनील पाटील या व्यक्तीने मास्टरमाईंडची भूमिका पार पाडली आहे. सुनील पाटील हा राष्ट्रवादी काँग्रेसचाच कार्यकर्ता असून तो माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पूत्र ऋषिकेश देशमुख यांचा अत्यंत जवळचा मित्र आहे. राष्ट्रवादीच्या अनेक मंत्र्यांशीही सुनील पाटीलचे जवळचे संबंध आहेत, असा दावा भाजपचे पदाधिकारी मोहित कंबोज यांनी आज  पत्रकारपरिषदेत केला. 

सुनील पाटीलने 1 तारखेला सॅम डिसोजाला व्हॉट्सअॅप केलं होतं. चॅट नंतर व्हॉट्सअॅप कॉल केला होता. माझ्याकडे 27 लोकांची लीड असून मुंबईत क्रुझ पार्टी होणार आहे. त्यात ड्रग्जचं सेवन होणार आहे. माझी एनसीबीच्या एखाद्या अधिकाऱ्याशी चर्चा करून द्या, असं पाटीलने सॅमला सांगितलं होतं. त्यानंतर सॅमने एनसीबीच्या व्ही.व्ही. सिंग या अधिकाऱ्याशी बोलणं करून दिलं, असा दावाही त्यांनी केला.

किरण गोसावी हाच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सुनील पाटील यांचा पंटर आहे. या संपूर्ण प्रकरणाचा मास्टरमाइंडच सुनील पाटील आहे, असा दावा मोहित कंबोज यांनी केला आहे.

क्रूझ ड्रग्ज प्रकरणाचा मास्टरमाइंड सुनील पाटील आहेत. सुनील पाटील हे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असून ते धुळ्याचे आहेत. गेल्या 20 वर्षापासून त्यांचा राष्ट्रवादीशी संबंध राहिला आहे. केवळ संबंधच राहिले नाही तर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे चिरंजीव ऋषिकेश देशमुख यांचे जिगरी दोस्त आहेत. आर आर पाटील यांचे निकटवर्तीय होते. राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांशी सुनील पाटील यांचे घरगुती संबंध आहेत, असा दावा कंबोज यांनी केला. अनिल देशमुखांच्या ईडी प्रकरणातही पाटीलचं नाव आहे, असंही त्यांनी सांगितलं. सुनील पाटील बदल्यांचं रॅकेट चालवत होते. दिल्लीत बसून ते हे रॅकेट चालवत असतात. तेच पैसा घेऊन संबंधित मंत्र्यांना द्यायचे. त्यांचं राज्यभरात बदल्यांचं रॅकेट होतं. सरकार बदलल्यानंतर ते भूमिगत झाले. सरकार आल्यानंतर पुन्हा सक्रिय झाले. मोठमोठ्या हॉटेलमध्ये त्यांच्या पार्ट्या चालतात. पाटील यांचे गृहमंत्र्यांशी कनेक्शन कसे? असा सवाल त्यांनी केला.

Leave a Reply

%d bloggers like this: