fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणावरून एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची हकालपट्टी

मुंबई : क्रुज ड्रग्ज पार्टी प्रकरणामुळे प्रकाशझोतात आलेले एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची मुंबई एनसीबी कार्यालयातून हकालपट्टी करण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाचा तपास त्यांच्याकडून काढून घेण्यात आला आहे. त्यांच्या जागी वरिष्ठ आयपीएस अधिकारी संजय सिंग हे कामकाज पाहणार आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार, आर्यन खानसह इतर सहा प्रकरणांचा तपास आता दिल्ली एनसीबी करणार आहे. यामध्ये नवाब मलिक यांचे जावई समीर खान,अरमान कोहली, इक्बाल कासकर आदींच्या प्रकरणाचाही समावेश आहे. समीर वानखेडे यांची एनसीबीच्या दिल्ली कार्यालयात बदली करण्यात आली आहे. मात्र, मुंबई एनसीबीच्या विभागीय संचालकपदाची जबाबदारी ही त्यांच्याकडेच कायम राहणार आहे.

दरम्यान, आर्यन खानचा खटला निकाली काढण्याच्या बदल्यात खंडणी उकळल्याचा गंभीर आरोप वानखेडे यांच्यावर  करण्यात आले आहेत. तसेच राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी देखील वानखेडे यांच्यावर यूपीएससी परीक्षेत आरक्षण मिळवण्यासाठी खोटा जातीचा दाखला दिल्याचा आरोप करत सतत नवनवीन खुलासे केले आहेत. आज वानखेडे यांच्या बदली नंतर त्यांनी ट्विट केले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading