शरद पवारांच्या व्यक्तव्यावरून फडणवीस म्हणाले, “ज्यांना काही समजतच नाही, अशी मंडळी यात बोलत..”

नाशिक : पेट्रोल-डिझेल दरकपात आणि जीएसटीचा परतावा या मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि विरोधक ऐन दिवाळीत आमने सामने उभे राहिले आहेत. केंद्र सरकारने राज्याचे जीएसटीचे देणे आहे ते लवकर द्याव म्हणजे राज्यसरकार नागरिकांना अशा प्रकारची मदत करण्याचा निर्णय घेईल, या शरद पवार यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी “ज्यांना काही समजतच नाही, अशी मंडळी यात बोलत आहेत”, असे म्हणत थेट शरद पवारांवर उलट निशाणा साधला आहे.

फडणवीस म्हणाले,  “मी दुर्दैवाने म्हणतो की ज्यांना काही समजतच नाही, अशी मंडळी यात बोलत आहेत. जीएसटीची रक्कम मिळतेच आहे. गेल्या वर्षीही मिळाली, या वर्षीही मिळणार आहे. ती कुठेच जात नाही. पण केंद्राने  ५ रुपये कर कमी केला की आपोआप ७ रुपये टॅक्स कमी होतो.”

शरद पवार काय म्हणाले? 

गेल्या महिन्याभरापासून देशात पेट्रोल-डिझेलचे दर सातत्याने वाढत असताना दिवाळीच्या आदल्या दिवशी केंद्रानं हे दर कमी केले. त्यानंतर काही राज्य सरकारांनी देखील पेट्रोल-डिझेलचे दर कमी करण्याचा निर्णय घेतला. त्यासंदर्भात महाराष्ट्रात असा निर्णय कधी होणार? या प्रश्नावर शरद पवार यांनी आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, “राज्य सरकारने निश्चित दिलासा देऊ असे म्हटले आहे. पण केंद्र सरकारने राज्याचे जीएसटीचे देणं आहे ते लवकर द्यावे म्हणजे लोकांना अशा प्रकारची मदत करण्याचा निर्णय घेता येईल”.

 

Leave a Reply

%d bloggers like this: