राज्यात पुढील काही दिवसात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता; पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरला यलो अलर्ट

पुणे : ऐन सणासुदीच्या काळात राज्यात पुढील तीन ते चार दिवसात राज्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. उद्या पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सिधुदुर्ग, रत्नागीरी, रायगड या जिल्ह्यांना हवामान खात्याने यलो अलर्ट दिला आहे.

राज्यात सकाळच्या सुमारास हलकी थंडी जाणवू लागली असली तरी दिवाळीत मात्र ढगाळ हवामान आहे. काल लक्ष्मी पूजनच्या दिवशी पुणे परिसरात पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. तर उद्यापासून पुढील चार दिवस पुण्यात हवामान खात्याने राज्यातील काही भागात यलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे पुढील काही दिवस राज्यात वीजांच्या गडगडाटासहीत काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. शनिवार आणि रविवारी मुंबई आणि ठाण्यात देखील तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती. सध्या लक्षद्विप दक्षिण-पूर्व अरबी समुद्रात हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होतं आहे. पुढील तीन दिवसांत हवेच्या कमी दाबाचं हे क्षेत्र आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

 

Leave a Reply

%d bloggers like this: