शेकडो पणत्या प्रज्वलित करून शहिदांचे स्मरण; ‘एक पणती शहिदांसाठी’ विशेष उपक्रम

पुणे : दिवाळी पाडव्याचे औचित्य सासून पुणे नवरात्रौ महोत्सवातर्फे ‘एक पणती शहिदांसाठी’ या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. शिवदर्शन चौकात शेकडो पणत्या प्रज्वलित करून शहिदांचे स्मरण करण्यात आले.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून  दत्तवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण इंदलकर उपस्थित होते.  त्याच बरोबर पुणे नवरात्रौ  महोत्सवाचे पदाधिकारी घनश्याम सावंत, नंदकुमार बानगुडे, नंदकुमार कोंढाळकर,रमेश भंडारी,ऍड चंद्रशेखर पिंगळे, सागर आरोळे,सागर बागूल महेश ढवळे , अभिषेक बागुल,इम्तियाज तांबोळी,सुरेश गायकवाड,गणेश खंडारे,बाबासाहेब पोळके,संतोष पवार, गौरव साळवे, सुनील लोखंडे, गोरख मरळ, राहुल तौर,राहुल शिंदे,रवी मोरे, इर्शाद शेख, उमाकांत गायकवाड, तुषार पवार,अक्षय सातपुते,यश कट्टीमनी,अजय ढावरे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी पुणे महानगरपालिकेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते आबा बागुल म्हणाले की, ज्यांच्या प्राणांच्या आहुतीमुळे आज आपल्या सर्वांचे जीवन प्रकाशमय आहे, आपल्या कुटुंबापासून दूर राहून सर्व सामन्यांना जगता यावे यासाठी सीमेवर खडा पहारा देणारे सैनिक सीमेवर आतंकवादी कारवाया रोखताना शाहिद होतात अशा शहीद जवानांचे स्मरण आणि त्यांच्या कुटुंबीयांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ‘एक पणती शाहिदांसाठी’ या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. गेल्या 10 वर्षापासून शाहिद भारतीय सैनिक व शाहिद पोलीस बांधवांनी देशासाठी दिलेल्या बलिदानाची आठवण आजच्या पिढीला करून देण्यासाठी व देशप्रेम सैदैव त्यांच्यात तेवत ठेवण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात येते असे आबा बागुल म्हणाले.

या प्रसंगी पॅराप्याजिकल सेंटर मधील आर्मीचे सैनिक सहा वेळा बॅडमिंटन व्हीलचेअर स्पर्धेत नॅशनल जिंकणारे सुरेश कारकी यांच्या हस्ते पणती प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. शिवदर्शन चौक येथे रांगोळी काढून, स्पीकरवर देशभक्तीपर गीते व  शेकडो पणत्या प्रज्वलित करून शहीद जवानांचे स्मरण करण्यात आले. रस्त्यावरून जाणारे नागरिक हे सर्व पाहून मोठ्या हिरिरीने सहभागी झाले होते. सर्व परिसर देशभक्तीच्या वातावरणात नाहून निघाला.

अमित बागुल म्हणाले, 17 वर्ष व्हीलचेअरवर असून देखील देशासाठी मेडल जिकण्याच्या सुरेश कारकी यांच्या जिद्दीला सलाम असून भावी पिढीला सैनिक व पोलिसांच्या बलिदानाचे स्मरण होऊन जागरूक नागरिक तयार होण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.

Leave a Reply

%d bloggers like this: