Saturday, May 2, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

Pune – दिवाळीत लसीकरण तीन दिवस बंद

पुणे : जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा वेग वाढला आहे. मात्र दिवाळीमुळे केंद्रावर येऊन लस घेणाऱ्या नागरिकांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे सरकारी रुग्णालयांमधून सुरू असलेले कोरोना प्रतिबंधक लसीकरण दिवाळीत तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार गुरुवारी, ४ नोव्हेंबर रोजी नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन असल्याने केंद्रावर लसीकरण होणार नाही. तर शुक्रवारी, ५ नोव्हेंबर रोजी सकाळच्या सत्रात लसीकरण होईल आणि दुपारनंतर केंद्र बंद राहणार आहेत. त्यानंतर येत्या शनिवारी, ६ नोव्हेंबर रोजी आणि रविवारी ७ नोव्हेंबर रोजी केंद्र बंद ठेवण्यात येणार आहेत.

पुण्यात १८ हून जास्त वय असलेल्या २६ लाख ४५ हजार ७०० पात्र नागरिकांना लसीकरणाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. परंतु प्रत्यक्षात मात्र यापेक्षा जास्त लाभार्थ्यांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. त्यामुळे आता पहिला डोस राहिलेल्या नागरिकांपर्यंत पोहोचणे आणि दुसरा डोस घेण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित केले जात असल्याचे पुणे महापालिकेचे लसीकरण अधिकारी डॉ. सूर्यकांत देवकर यांनी सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading