एचएसबीच्या मदतीने लीला पुनावाला फाउंडेशनतर्फे ३००० गरजू कुटुंबांना अत्यावश्यक सामग्रीचे वाटप

पुणे: कोविड-19 महामारीच्या काळात, प्रत्येक मावळणारा दिवस हा जगण्याची नवी आव्हाने घेऊन येत आहे, आणि भितीचे सावट दिवसेंदिवस तीव्र होत असतानाच, काहींसाठी डोक्यावर छप्पर आणि अन्न मिळवणे ही एक देखील एक गरज बनली आहे. अश्यातच समाजसेवेच्या भावनेतुन आणि सामाजीक जाणिवेतुन कोविड १९ प्रभावित कुटुंबाांना पाठिंबा देण्यासाठी निधीद्वारे योगदान देऊन एचएसबीसी टेक्नॉलजी इंडिया (एचटीआय) ने लीला पुनावाला फाउंडेशनसोबत हातमिळवणी केली आहे. एचएसबीसी हे एलपीएफच्या बहुमुल्य भागीदारांपैकी एक आहेत. आर्थिकरित्या दुर्बल आणि टूमारो टूगेदर या शालेय प्रकल्पाअंतर्गत फाउंडेशनमधुन मदत मिळविणार्या लीला ज्युनिअर, लीला सिनियर्स मुलींच्या ३००० हून अधिक कुटुंबांना हे कोविड -१९ रिलीफ अत्यावश्यक किट देण्यात आले. ही मदत त्या कुटुंबाना देण्यात आली जे कोवीड्च्या प्रकोपामुळे सर्वाधिक प्रभावित आहेत, फाउंडेशनच्या मुलींन- व्यतरिक्त अन्य काही कुटुंबे जसे की शाळेतील सहाय्यक कर्मचारी आदि यांचाही यात समावेश आहे. पुणे शहरी आणि ग्रामीण भागातील १५ एलपीएफ संबंधित शाळांमध्ये किट वितरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.

या वितरण मोहीमेत मुली आणि त्यांच्या कुटुंबियांना एक महिन्याचा रेशनचा पुरवठा करण्यात आला, ज्यामुळे कुटुंबांना त्यांच्या अन्नाशी संबंधित मूलभूत गरजांचे व्यवस्थापन करण्यात मदत होईल.एचएसबीसी टेक्नॉलॉजी इंडिया (एचटीआय) मधील गिरीश बिदानी आणि दामिनी खैरे यांच्यासह एलपीएफचे संस्थापक विश्वस्त फिरोज पुनावाला हे मुलींना वैयक्तिकरित्या किट सुपूर्द करण्यासाठी उपस्थित होते.

“यावेळी एचएसबीसी इंडिया कॉर्पोरेट सस्टेनेबिलिटी प्रमुख अलोक मजुमदार म्हणाले, आम्ही कोविड-१९ विरुद्धच्या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी वचनबद्ध आहोत, सार्वजनिक आरोग्य आणि अन्न प्रणालींसमोर अभूतपूर्व आव्हाने निर्माण झाली आहेत आणि लीला पुनावाला फाऊंडेशनसोबतची आमची भागीदारी याच दिशेने टाकलेला आणखी एक पाऊल आहे ज्यामध्ये वंचित शालेय मुलींच्या कुटुंबांना अन्न, आवश्यक वस्तू आणि स्वच्छते संबंधित वस्तुंचा पुरवठा केला जात आहे.”

“आपले विचार व्यक्त करताना फिरोज पुनावाला म्हणाले, ज्या कुटुंबांना या आपत्तीमुळे खूप नुकसान झाले आहे अशा कुटुंबांना मदतीचा हात देण्याचे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि यात आमची साथ देणार्या आमच्या महान भागीदार, एचएसबीसी टेक्नॉलॉजी इंडियाच्या पाठिंब्याचे आम्ही मनापासुन आभारी आहोत.

Leave a Reply

%d bloggers like this: