विश्वानंद केंद्राच्यावतीने धन्वंतरी याग संपन्न

पुणे: सर्वसामान्यांच्या उत्तम आरोग्यासाठी सातारा रस्त्यावरील विश्वानंद केंद्रच्यावतंीने धन्वंतरी जयंतीनिमित्त धन्वंतरी याग संपन्न झाला. यावेळी  प्रदीप चोरडिया व मीना चोरडिया यांच्या हस्ते विधीवत पूजन करण्यात आले.

अरविंद कडूस व डॉ. प्रियदर्शनी कडूस यांच्या हस्ते धन्वंतरीचे पूजन करण्यात आले. यावेळी विश्वानंद केंद्राचे व्यवस्थापकीय संचालक  डॉ. अजितकुमार मंडलेचा, डॉ. गौस मुजावर, कृष्णा सुरे,  शाकीर शेख व संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते.

डॉ. अजित मंडलेचा म्हणाले, विश्वानंद केंद्रच्यावतीने धनत्रोयोदशी म्हणजे धन्वंतरी जयंती निमित्त दरवर्षी धन्वंतरी यागाचे आयोजन केले जाते व सर्व सामान्यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली जाते. या महायज्ञातील ऊर्जेमुळे लोकांचे आरोग्य चांगले राहावे तसेच त्याचे चैतन्य वर्षभर टिकावे अशी प्रार्थना केली जाते. यंदा त्याबरोबर कोरोना महामारीमुळे सर्वांचे जीवन विस्कळीत झाले असून ही महामारी लवकर दूर होवो अशी प्रार्थना देखील आम्ही केली.

Leave a Reply

%d bloggers like this: