वोक्हार्ट हॉस्पिटलने पक्षाघात आजाराच्या जागरूकतेसाठी बनवला “नाशिक स्ट्रोक क्लब”

नाशिक : जागतिक पक्षाघात दिनाचे औचित्य साधून पक्षाघात या आजाराविषयी जागरूकता निर्माण व्हावी, या उद्देशाने नाशिक येथील वोक्हार्ट रूग्णालयाने “नाशिक स्ट्रोक क्लब” बनवला असून यावेळी खास परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. वोक्हार्ट हॉस्पिटल आणि मेंदूविकार तज्ञ डॉ. विशाल सावळे यांच्या प्रयत्नांमुळे पक्षाघातातून वाचलेल्या ३० हून अधिक रूग्णांनी यात सहभाग घेतला. या कार्यक्रमात पक्षाघात या आजारावर यशस्वीरित्या मात करून आयुष्य़ जगणारे रुग्ण उपस्थित होते. त्यांच्याच हस्ते आज “स्ट्रोक क्लिनिक”आणि “स्ट्रोक रिहॅबिलिटेशन युनिटचे” आज लोकार्पण करण्यात आले. मेंदूला ऑक्सिजन व पोषणमूल्यांचा पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये गाठ तयार झाल्याने किंवा त्या वाहिन्या फुटल्याने पक्षाघात होतो. पक्षाघाताचे दोन प्रकार आहेत; रोहिण्यांमध्ये रक्ताच्या गुठळ्या निर्माण झाल्याने इस्केमिक स्ट्रोक येतो, तर रक्तवाहिन्या फुटल्यावर रक्त वाहून जाते आणि त्यामुळे हेमोराजिक स्ट्रोक येतो. सध्या तरूणांमध्ये पक्षाघाताचा धोका वाढताना दिसून येत आहे. धुम्रपान, मद्यपान, मधुमेह, लठ्ठपणा, विनाकारण औषधांचा वापर आणि कौटुंबिक इतिहास हे यामागील मुख्य कारणं आहेत असे प्रतिपादन वोक्हार्ट हॉस्पिटल येथील प्रख्यात मेंदूविकार तज्ञ डॉ. विशाल सावळे यांनी केले.

डॉ. सावळे पुढे म्हणाले की, “पक्षाघातामुळे दरवर्षी लाखो लोकांना जीव गमवावा लागतो. पक्षाघाताचा झटका आल्यास रूग्णाला पुढील साडे चार तासात उपचार मिळणे गरजेचं असतं. वेळीच उपचार न झाल्यास रूग्ण दगावू शकतो. पक्षाघाताबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी यातून बरे झालेल्या रूग्णांचा एक गट “नाशिक स्ट्रोक क्लब” हा बनविणे काळाची गरज होती आणि यासाठी वोक्हार्ट हॉस्पिटलने पुढाकार घेतला सुद्धा आहे. या कार्यक्रमात ३० हुन अधिक रूग्णांचा सत्कार करण्यात आला. असाच कार्य़क्रम दर तीन महिन्यांनी घेतला जाईल जेणेकरून रूग्ण आपल्या अनुभवातून सामाजिक जागरूकता निर्माण करू शकतील असेही ते पुढे सांगतात”. कार्यक्रमध्ये रुग्णांना योग्य आहार आणि व्यायामाच्या माध्यमातून पक्षाघातानंतर लवकरात लवकर पूर्ववत स्थितीमध्ये कसे येता येईल याबद्दल मार्गदर्शन नामवंत आहारतज्ञ आणि फिजिओथेरपिस्ट यांनी केले. डॉ. सावळे सांगतात की वोक्हार्ट हॉस्पिटल हे एक “स्ट्रोक रेडी” हॉस्पिटल असून पक्षाघाताची आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी येथे वेगळी टीम कार्यान्वित आहे.

 

Leave a Reply

%d bloggers like this: