उद्या पासून मध्य महाराष्ट्र आणि कोकणासह दक्षिण मराठवाड्यातील काही भागात पाऊस कोसळण्याची शक्यता

पुणे:राज्यात सगळीकडेच दिवाळीच्या सणाची धामधूम सुरू असताना ऐन दिवाळीत राज्याच्या काही भागात पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हवामान खात्याच्या अंदाजानूसार उद्या पासून मध्य महाराष्ट्र आणि कोकणासह दक्षिण मराठवाड्यातील काही भागात पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.

पुढचे तीन ते चार दिवस मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा भागात हलक्या सरींची शक्यता आहे. तर कोकणातील सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी या जिल्हातील काही भागात 1 नोव्हेंबरपासून पावसाची शक्यता आहे. पुणे आणि सोलापूर जिल्हातील काही भागात तुरळक पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान खात्याच्याअंदाजानूसार राज्यातील या भागात विजांचा कडकडात आणि मेघगर्जनेचीही शक्यता आहे. अचानक कोसळणाऱ्या पावसाने आता शेतकऱ्यांची चिंता वाढण्याची शक्यता आहे. रब्बी हंगामाच्या कामाने वेग धरला असताना पूर्व मशागतीची कामंही अंतिम टप्प्यात आली आहेत.

Leave a Reply

%d bloggers like this: