मराठा महासंघाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल राजेंद्र कोंढरे यांचा सत्कार

पुणे : अखिल भारतीय मराठा महासंघ, पुणे तर्फे अखिल भारतीय मराठा महासंघाच्या राष्ट्रीय अध्यक्ष राजेन्द्र कोंढरे यांची एकमताने नियुक्ती झाल्याबद्दल जाहीर सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते “पुढचे पाऊल” या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक बाळासाहेब मारणे, पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस नामदेव मानकर, पुणे शहर अध्यक्ष गुलाबदादा गायकवाड, युवक अध्यक्ष युवराज दिसले, युवा उद्योजक रणजित बहिरट पाटील, महिला उपाध्यक्षा सौ सुधाताई पाटील, दत्तात्रय गायकवाड, नितीन साळुंखे, व्यंकटेश बोडके, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

तसेच पुणे शहर युवक शाखेच्या वतीने पुणे शहर स्तरावर व पुण्यातील सर्व आठ विधानसभा मतदारसंघ खडकवासला, कसबा, पुणे कॅन्टोन्मेंट, शिवाजीनगर, वडगाव शेरी, हडपसर, कोथरूड या प्रमाणे ५१  नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा नियुक्ती पत्र व पुढचं पाऊल पुस्तक व भगवी पट्टी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी राजेंद्र कोंढरे यांनी  युवकांना रोजगार संबंधी, व्यावसायिक दृष्टिने पुढचे पाऊल टाकण्याची दिशा, आरक्षण संदर्भात मार्गदर्शन केले. यावेळी  सूत्रसंचालन विजय वाकचौरे यांनी केले.  स्वागत युवक कार्याध्यक्ष राकेश गायकवाड यांनी तर आभार सरचिटणीस सचिन वडघुले यांनी मानले. यावेळी उपाध्यक्ष सुनिल पवार, युवक प्रसिद्धी प्रमुख भरत गायकवाड व इतर पदाधिकारी उपस्थित होते

Leave a Reply

%d bloggers like this: