1 आणि 2 नोव्हेंबर रोजी राज्यात काही ठिकाणी पावसाचा इशारा

पुणे:यंदाचे नैऋत्य मोसमी वारे माघारी परतल्यानंतर महाराष्ट्रासह देशात बहुतांशी ठिकाणी पावसाने पुर्णपणे उघडीप घेतली आहे. दरम्यान दक्षिण आणि ईशान्य भारतात मात्र काही ठिकाणी जोरदार पाऊस कोसळला आहे. मान्सूनच्या परतीनंतर राज्यात पावसाने उसंत घेतली आहे. पण आता राज्यात पुन्हा एकदा पावसासाठी पोषक हवामान निर्माण होतं आहे. त्यामुळे नोव्हेंबरची सुरुवात पावसाने होणार आहे. हवामान खात्याने 1 आणि 2 नोव्हेंबर रोजी राज्यात काही ठिकाणी पावसाचा इशारा दिला आहे.

1 आणि 2 नोव्हेंबर रोजी हवामान खात्याने दक्षिण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. सोमवारी 1 नोव्हेंबर रोजी रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग, सांगली आणि कोल्हापूर या पाच जिल्ह्यात येलो अलर्ट जारी केला असून याठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तर रायगड, सोलापूर आणि पुण्यातही तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळणार आहेत.

Leave a Reply

%d bloggers like this: