पुणे मेट्रो प्रगतीचा आढावा पुणे मेट्रो ने दोन कॉरिडॉरमध्ये विभागला

पुणे : पुणे मेट्रो प्रगतीचा आढावा पुणे मेट्रो दोन कॉरिडॉरमध्ये विभागली असून यांमध्ये ३० स्थानकांचा समावेश आहे. पुणे मेट्रोची एकूण लांबी सुमारे ३३.१ किमी आहे. पिंपरी चिंचवड ते स्वारगेट या कॉरिडॉरची (कॉरिडॉर- १) लांबी 17.4 किमी असून यामध्ये शिवाजी नगर ते स्वारगेट असा ६ किमीचा भुयारी मार्ग आहे. तर वनाज ते रामवाडी (कॉरिडॉर 2) या मार्गाची लांबी १५ किमी असून हा मार्ग उन्नत आहे. पुणे मेट्रोचे काम वेगाने सुरू आहे. आतापर्यंत पुणे मेट्रोचे ६५ टक्के काम पूर्ण झाले असून लवकरच प्रवाशांसाठी प्राधान्य विभाग (मार्ग) कार्यान्वित होणार आहेत.

संत तुकाराम नगर ते फुगेवाडी आणि वनाज ते गरवारे महाविद्यालय असे हे प्राधान्य विभाग (मार्ग) आहेत. पुणे मेट्रो प्रकल्प डिसेंबर २०२२ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. पुणे मेट्रोने आपल्या प्रकल्प उभारण्याच्या सुरुवातीपासून पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी विविध हरित उपक्रम हाती घेतले आहेत. सौर ऊर्जेचा मोठ्या प्रमाणावर वापर, पावसाचे पाणी साठवण, बायोडायजेस्टर, वृक्षारोपण, झाडांचे पुनः रोपण आणि हरित इमारती हे काही उल्लेखनीय उपक्रम आहेत. पुणे मेट्रोच्या मार्गिकत येणारे एकही झाड पुणे मेट्रोने तोडलेले नाही. पुणे मेट्रोने नाविन्यपूर्ण रूट-बॉल तंत्रज्ञानाद्वारे मार्गिकत येणाऱ्या झाडांचे पुनर्रोपण करण्यासाठी करण्यात आले आहे. स्थानिक प्रशासनाद्वारे उपलब्ध करून दिलेल्या विविध उद्यान आणि परिसरात ही झाडे लावण्यात आली आहेत. पुणे मेट्रोने आतापर्यंत २२६१ झाडांचे पुनर्रोपण पूर्ण केले आहे. याशिवाय पुणे मेट्रोने पुणे शहर आणि आसपासच्या विविध ठिकाणी १५००० हून अधिक नवीन झाडे लावली आहेत.

प्रत्यारोपणानंतर 80 टक्क्यांहून अधिक झाडे जगली आहेत. रिच 1 या मार्गिकची काम ८३.२ टक्के पूर्ण झाले आहे. रिच २ या मार्गिकचे काम ९५.८ टक्के आणि रिच ३ या मार्गाची एकूण काम ५५ टक्के पूर्ण झाले आहे. संत तुकाराम नगर स्टेशनचे काम पूर्ण झाले असून फुगेवाडी स्टेशनचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे. प्राधान्य विभाग १ (संत तुकाराम नगर ते फुगेवाडी) आणि विभाग २ (वनाज ते गरवारे कॉलेज) येथील स्थानकांची कामे ५०-६० टक्के पूर्ण झाली आहे. मेट्रोच्या एकूण १२ किमी लांबीच्या भुयारी मार्गापैकी ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. इलेक्ट्रिक ओएचईचे (OHE) काम ५० टक्के पूर्ण झाले आहे. रेंज हिल डेपोचे काम ८३ टक्के पूर्ण झाले आहे तर हिल व्यू पार्क डेपोचे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. या प्रसंगी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी म्हटले आहे की लवकरच पुणे मेट्रोच्य प्राधान्य मार्ग १ व २ ची कामे पूर्ण करून मेट्रो प्रवाशांसाठी मेट्रोचे कार्यान्वयन करण्यात येइल.

Leave a Reply

%d bloggers like this: