सणासुदीच्या काळासाठी ऑरा तर्फे आकर्षक ऑफर्स
पुणे : सणासुदीचा काळ सुरू झालेला असताना, ऑरा या हिऱ्याच्या दागिन्यांच्या भारतातील आघाडीच्या व विश्वासाच्या ब्रॅण्डला आकर्षक दिवाळी ऑफर्स जाहीर करताना आनंद होत आहे. या ऑफर्स आकर्षक नवीन कलेक्शनला उत्कृष्ट डायमंड ज्वेलरीची जोड मिळाल्यामुळे सणासुदीच्या साजरीकरणाला आवश्यक ती झळाळी नक्कीच प्राप्त होणार आहे.
ऑरा धनत्रयोदशीसाठी खास नवीन एक्स्लुजिव दागिने सादर करून ग्राहकांसोबत सणाचा आनंद साजरा करत आहे. सणासुदीचा संपूर्ण काळ तुम्ही चमकत राहाल याची हमी देणारे हे दागिने १४ कॅरट रोज गोल्डमध्ये घडवल्यामुळे त्यांचे ग्लॅमर वाढले आहे. ऑराचे नवीन दागिने व ऑफर्स यांचा लाभ घेऊन तुम्ही चकाकत्या अलंकारांसह सण साजरे करू शकता.
ऑराने नुकताच फॅशन डिझायनर फाल्गुनी शेन पीकॉक यांच्यासोबत सहयोग करून, आपली पहिलीवहिली डिझायनर ब्रायडल ज्वेलरी लाइन बाजारात आणली आहे. फाल्गुनी शेन पीकॉक यांची नेत्रसुखद व अनन्यसाधारण सौंदर्यपूर्ण डिझाइन्स आणि ऑराकडे असलेली हिरे अलंकाराची परंपरा यांच्या मिलाफातून सहा नेकलेसेस व त्याला साजेशा इयररिंग्ज यांचे खास कलेक्शन साकार झाले आहे. हे कलेक्शन सर्वोत्कृष्ट क्राउन स्टार हिऱ्यांसह तयार करण्यात आले आहे. ऑरा हा शून्य टक्के व्याजाने ईएमआय सुविधा देणारा एकमेव ज्वेलरी ब्रॅण्ड आहे. हा ब्रॅण्ड सोने, हिरे व सॉलिटेअर्स दागिन्यांच्याही आखर्षक ऑफर्स देत आहे. शिवाय गोल्ड कॉइन्स तसेच सोने व चांदीचे बार्सही खरेदीसाठी उपलब्ध आहेत.
ऑरा इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक दीपू मेहता म्हणाले की हे वर्ष अनेकांसाठी गेल्या वर्षाहूनही खडतर गेले आहे आणि लोक सणासुदीच्या काळाकडे दिलासा म्हणून बघत आहेत. दिवाळी अगदीच जवळ आल्यामुळे आम्हाला रिटेल अनुभव अधिक आनंददायी करायचा आहे आणि आमच्या आकर्षक फेस्टिव ऑफर्ससह उत्पादने सर्वांसाठी उपलब्ध करायची आहेत.
