Wednesday, June 17, 2026
Latest NewsMAHARASHTRA

आजी-माजी आमदार पेपरबाजी करून जनतेची खोटी आपुलकी मिळवण्याचा प्रयत्न करतात – अतुल खूपसे पाटील

करमाळा: ऐन दिवाळीत देखील करमाळा तालुक्यातील घरगुती वीज कनेक्शन तोडण्याची तीव्र मोहीम सुरू आहे, तर शेतीपंपाची वीज 6 तारखे पासून तोडण्याचे आदेश आहेत. एकीकडे गेल्या दोन वर्षापासून कोरोना सारख्या संकटाने जनता हैराण झाली आहे. आणि दुसरीकडे महा विकास आघाडी सरकारकडून फक्त वसुली सुरू आहे. असे असताना तालुक्यातील विद्यमान आणि माजी आमदारांमध्ये सध्या उगीचच श्रेय वादाची लढाई सुरू आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही आजी माजी आमदार सत्तेच्या केंद्रस्थानी आहेत. मात्र पत्रकबाजी आणि पेपरबाजी करत जनतेची खोटी आपुलकी मिळवण्याचा अट्टाहास करत असल्याचा घणाघात जनशक्ती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अतुल खूपसे पाटील यांनी केला.

पुढे बोलताना ते म्हणाले की, राज्यासह तालुक्यातील विज कपातीचे आदेश महा ‘वसुली’ सरकारने दिले आहेत. राज्यातील जनतेशी या सरकारला काही देणे घेणे नाही. दिवाळी सण हा हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा सण मानला जातो. आणि अशा या सणामध्ये खासकरून घराघरांमध्ये रोषणाई केली जाते. मात्र या सरकारकडून घरातच नव्हे तर सर्वसामान्यांच्या जीवनात देखील अंधार करण्याचे पाप सुरू आहे. यासाठी आजी-माजी आमदारांनी वेगी पत्रकबाजी, फोटोसेशन व पेपर बाजी केली. मात्र त्या अगोदरच महावितरणने वीज बिल मुदत वाढ करून दिली असून ती फक्त 6 नोव्हेंबर पर्यंत असल्याचे त्यांचे अधिकारी सांगत आहेत. घरगुती वीज कनेक्शन या काळात तोडले जाणार आहे असे अधिकारी सांगत आहेत. त्यामुळे गरिबांची ही दिवाळी महाविकास आघाडी अंधारात घालवणार का? असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading