Sunday, September 27, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

मेट्रो- रेंजहिल्स ते कसबा पेठ दरम्यान बोगद्याचे काम पूर्ण

पुणे:पिंपरी चिंचवड स्वारगेट मार्गावर सुमारे १६ किलोमीटर मेट्रो प्रकल्पाचे काम सध्या सुरू आहे. या मार्गावर रेंजहिल्स ते स्वारगेट दरम्यान सुमारे साडेपाच किलोमीटरचा मार्ग भुयारी असेल. त्यातील रेंजहिल्स ते कसबा पेठ दरम्यान बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे. आता स्वारगेटपासून सुरू असलेल्या बोगद्याचे काम महात्मा फुले मंडईपर्यंत पूर्ण झाल्याचे मंगळवारी दिसून आले. पुढील महिन्यात हा बोगदा कसबा पेठेपर्यंत पोचेल, अशी माहिती महामेट्रोच्या अधिकृत सूत्रांनी दिली.

पिंपरी चिंचवड-स्वारगेट मार्गावर रेंजहिल्स ते स्वारगेट दरम्यानच्या भुयारी मार्गाचे काम वेगाने सुरू असून पुढील महिन्यांत ब्रेक थ्रू मिळणार आहे. त्यामुळे स्वारगेटवरून सुरू झालेला बोगदा कसबा पेठेपर्यंत पोचणार आहे.परिणामी रेंजहिल्स ते स्वारगेट दरम्यानच्या एका बाजूच्या बोगद्याचे काम होईल.

रेंजहिल्स ते स्वारगेट दरम्यान मेट्रोसाठी दोन बोगदे असतील. त्यातील दुसऱ्या बोगद्याचे काम गेल्या महिन्यात सुरू झाले आहे. कसबा पेठेपर्यंत तो बोगदा मार्च महिन्यात पोचेल. त्यानंतर दोन्ही बोगद्यांतील अंतर्गत कामे सुरू होतील वर्षभरात स्थानकांची कामे पूर्ण होतील. टाटा-गुलेरमार्ग कंपनीकडून भुयारी मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू आहे. पुढील वर्षअखेरीस भुयारी मेट्रोची चाचणी घेण्याचा प्रयत्न असेल, असेही सूत्रांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading