पुणे जिल्हा अजिंक्यपद टेनिस स्पर्धेत अभिराम निलाखे, दक्ष अगरवाल, श्रावणी देशमुख, रिया भोसले यांना विजेतेपद
पुणे : पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना यांच्या वतीने आयोजित व महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए)यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या पुणे जिल्हा अजिंक्यपद टेनिस स्पर्धेत मुलींच्या गटात रिया भोसले, श्रावणी देशमुख यांनी तर, मुलांच्या गटात अभिराम निलाखे, दक्ष अगरवाल यांनी आपापल्या गटातील प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून विजेतेपद संपादन केले.
एमएसएलटीए स्कुल ऑफ टेनिस, म्हाळुंगे बालेवाडी येथे पार पडलेल्या या स्पर्धेत अंतिम फेरीत 14 वर्षाखालील मुलांच्या गटात अंतिम फेरीत अव्वल मानांकित अभिराम निलाखेने चौथ्या मानांकित विश्वजीत सणसचा टायब्रेकमध्ये 6-5(7-3) असा पराभव करून विजेतेपद पटकावले. अभिराम हा बाळकृष्ण मंदिर येथे सातवी इयत्तेत शिकत असून पार्थ चिवटे टेनिस अकादमीमध्ये प्रशिक्षक पार्थ चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. त्याचे हे या वर्षातील या गटातील तिसरे विजेतेपद आहे. मुलींच्या गटात सातव्या मानांकित श्रावणी देशमुखहिने सहाव्या मानांकित रिशीता पाटीलचा 6-2 असा सहज पराभव करून विजेतेपदाचा मान पटकवला. श्रावणी ही नववी इयत्तेत सिंहगड स्प्रिंगडेल शाळेत शिकत असून महाराष्ट्र मंडळ येथे प्रशिक्षक धरणीधर मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते.
17वर्षाखालील मुलांच्या गटात अंतिम फेरीच्या लढतीत तिसऱ्या मानांकित दक्ष अगरवालने अव्वल मानांकित साहिल तांबटचा 6-0 असा एकतर्फी पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली. मुलींच्या गटात अव्वल मानांकित रिया भोसले हिने काल मानांकित रमा शहापूरकरचा 6-2 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना करंडक व प्रशस्तिपत्रक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण प्रवीण झिटे, प्रणव वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: उपांत्य फेरी: 14 वर्षाखालील मुले:
अभिराम निलाखे(1) वि.वि.अर्जुन किर्तने(3) 6-1;
विश्वजीत सणस(4) वि.वि.मनन अगरवाल(5) 6-5(9-7)
विश्वजीत सणस(4) वि.वि.मनन अगरवाल(5) 6-5(9-7)
अंतिम फेरी: अभिराम निलाखे(1) वि.वि.विश्वजीत सणस(4) 6-5(7-3);
14वर्षाखालील मुली: उपांत्य फेरी:
श्रावणी देशमुख(7) वि.वि.रितिका मोरे 6-3;
रिशीता पाटील(6) वि.वि.आस्मि टिळेकर(4) 6-5(11-9)
श्रावणी देशमुख(7) वि.वि.रितिका मोरे 6-3;
रिशीता पाटील(6) वि.वि.आस्मि टिळेकर(4) 6-5(11-9)
अंतिम फेरी: श्रावणी देशमुख(7) वि.वि. रिशीता पाटील(6) 6-2;
17वर्षाखालील मुले: उपांत्य फेरी:
साहिल तांबट(1) वि.वि.आर्यन कोटस्थाने(4) 6-5(7-3);
दक्ष अगरवाल(3) वि.वि.जय दिक्षित(6) 6-0;
साहिल तांबट(1) वि.वि.आर्यन कोटस्थाने(4) 6-5(7-3);
दक्ष अगरवाल(3) वि.वि.जय दिक्षित(6) 6-0;
अंतिम फेरी: दक्ष अगरवाल(3) वि.वि.साहिल तांबट(1)6-0;
17वर्षाखालील मुली: अंतिम फेरी:
रिया भोसले(1) वि.वि.रमा शहापूरकर 6-2.
रिया भोसले(1) वि.वि.रमा शहापूरकर 6-2.
